Pushpa 2 OTT Release Date: अल्लू अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटाच्या OTT रिलीजची प्रतीक्षा, कुठे आणि कधी पाहता येईल?

Updated on 13-Dec-2024
HIGHLIGHTS

Pushpa 2 चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

अल्लू अर्जुनचे चाहते Pushpa 2 चित्रपटाच्या OTT रिलीजबद्दल बोलत आहेत.

अहवालानुसार पुष्पा 2 चे OTT अधिकार 275 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी करण्यात आले आहेत.

Pushpa 2 OTT Release Date: भारतीय साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पोहोचल्यानंतर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. देशभरातील चाहत्यांनी चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असताना, चाहते Pushpa 2 चित्रपटाच्या OTT रिलीजबद्दल बोलत आहेत. जाणून घेऊयात चित्रपटाच्या OTT रिलीजबद्दल सर्व माहिती-

Also Read: BSNL Winter Bonanza Offer: दर महिन्याला मिळेल तब्बल 1300GB डेटा आणि Unlimited बेनिफिट्स

Pushpa 2 OTT Release Date

Pushpa 2 OTT रिलीजची तारीख अद्याप अज्ञात आहे. परंतु, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix ने वापरकर्त्यांना सूचित करण्यासाठी एक पोस्टर जारी केले होते. या पोस्टमध्ये शेअर करण्यात आले आहे की, ‘Pushpa 2: The Rule’ लवकरच तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह विविध भाषांमध्ये प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

त्याबरोबरच, पुष्पा 2 चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, पुढे आलेल्या अहवालानुसार पुष्पा 2 चे OTT अधिकार 275 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी करण्यात आले आहेत.

Pushpa 2 च्या कास्टबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपट अल्लू अर्जुन, मास्टर ध्रुवन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगदीश प्रताप बंदरी, जगपती बाबू, सुनील, अनसूया भारद्वाज, राव रमेश, षणमुख, सत्य, तारक पोनप्पा, अजय आणि बरेच कलाकार या मेगा ब्लॉकबस्टरचा भाग आहेत. पुढे आलेल्या अहवालानुसार, असाही दावा करण्यात आला आहे की, चाहते लवकरच Netflix वर Pushpa 1 आणि Pushpa 2 पाहण्यास सक्षम असतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :