TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 वरील ऑफर्स
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने अलीकडेच आपले नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स TECNO Phantom V Fold 2 आणि TECNO Phantom V Flip 2 भारतात लाँच केले आहेत. दरम्यान, आज 13 डिसेंबरपासून या Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 दोन्ही फोन्सची विक्री भारतात सुरु झाली आहे. टेक्नोचे नवीन फोल्डेबल स्मार्टफोन आज पहिल्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ही सेल आज दुपारी 12 वाजतापासून प्रसिद्ध इ-कॉमर्स Amazon India साईटवर लाईव्ह झाली आहे. पाहुयात TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-
Also Read: Best Smartphones Under 25000: 2024 मध्ये किफायतशीर किमतीत लाँच झालेले टॉप 5 फोन्स, पहा यादी
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता TECNO PHANTOM V Flip 2 ची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, PHANTOM V Fold 2 79,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, वर नमूद केलेल्या किमती विशेष लाँच प्राईस आहेत. या किमतीतील स्मार्टफोन मर्यादित काळासाठी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
त्यानंतर, हा फोन मूळ किमतीसह खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात येईल. त्याबरोबरच, या पहिल्या सेलमध्ये हा फोन EMI आणि एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध असेल. फ्लिप स्मार्टफोन कर्स्ट ग्रीन आणि रिपलिंग ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येईल. तर, फोल्डेबल स्मार्टफोन मूनडस्ट ग्रे आणि ट्रॅव्हर्टाइन ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल.
TECNO PHANTOM V Fold 2 मध्ये 7.85 इंच लांबीचा मुख्य LTPO AMOLED डिस्प्ले आहे. तर, 6.42 इंच लांबीच्या इनर LTPO AMOLED डिस्प्लेसह येईल. तर, PHANTOM V Flip 2 फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा मुख्य LTPO AMOLED डिस्प्ले आहे. तर, 3.64 इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले मिळेल.
स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी, कंपनीने फोल्डेबल फोनमध्ये Octa Core MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, फ्लिप स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8020 6nm प्रोसेसरसह येतो.
दोन्ही स्मार्टफोन एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये येतात. फोल्डेबल फोन 12GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. तसेच, फ्लिप फोनमध्ये देखील 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅमचा पर्याय मिळेल.
नवीन फोल्डेबल स्मार्टफोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनच्या पुढील बाजूस 32MP मुख्य आणि 32MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा उपलब्ध आहे.
त्याबरोबरच, फ्लिप फोनमध्ये 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओसाठी समोर एक सिंगल 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
TECNO PHANTOM V Fold 2 मध्ये 5750mAh बॅटरी आहे, जी 15W वायरलेस आणि 70W अल्ट्रा चार्जिंगला सपोर्ट करेल. तर, PHANTOM V Flip 2 मध्ये 4720mAh बॅटरी आहे, जी 70W अल्ट्रा चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी, दोन्ही फोनमध्ये USB TYpe-C चार्जिंग पोर्ट देण्यात मिळेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.