News https://www.digit.in Latest News from Digit.in Sat, 14 Dec 2024 10:50:00 +0530 mr News https://www.digit.in Latest News from Digit.in https://static.digit.in/digitcommon/thumb_24528_digitcommon_td_600.jpeg OpenAI चा पर्दाफाश करणारे भारतीय इंजिनियर Suchir Balaji यांचे निधन! एलॉन मस्कने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया   https://www.digit.in/mr/news/general/suchir-balaji-the-indian-engineer-who-exposed-openai-passes-away-know-details.html https://www.digit.in/mr/news/general/suchir-balaji-the-indian-engineer-who-exposed-openai-passes-away-know-details.html Sat, 14 Dec 2024 10:50:00 +0530

नुकतेच अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. 26 वर्षीय भारतीय इंजिनियर Suchir Balaji हा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा तोच भारतीय अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधक आहे, ज्याने OpenAI बद्दल जगाला सतर्क केले. बालाजीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तो त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. जाणून घेऊयात सविस्तर-

नक्की काय झाले?

सूचित बालाजी यांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल सॅन फ्रान्सिस्को पोलिस विभागाचे प्रवक्ते अधिकारी रॉबर्ट रुएका यांनी सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान काही चुकीचे झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, मीडिया रिपोर्टनुसार बालाजीचा मृतदेह 26 नोव्हेंबर रोजी त्यांच्या बुकानन स्ट्रीट अपार्टमेंटमध्ये सापडला होता. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2024 पर्यंत OpenAI साठी काम केले आहे.

Suchir Balaji

OpenAI चा केला होता पर्दाफाश

बालाजी ही अशी व्यक्ती होती, ज्यांनी केवळ AI मध्ये कामच केले नाही तर, या कंपनीतील चुकीच्या परंपरा आणि ऍक्टिव्हिटीज विरोधात जोरदार आवाज देखील उठवला. सुचीरने माहिती दिली होती की, OpenAI ने पत्रकार, लेखक, प्रोग्रामर इत्यादींच्या कॉपीराइट केलेल्या कंटेंटचा वापर चॅट GPT तयार करण्यासाठी परवानगीशिवाय केला आहे. याचा थेट परिणाम अनेक व्यवसाय आणि व्यापारांवर होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे OpenAI विरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास होता.

काय म्हणाले एलॉन मस्क?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक दिग्गज अब्जाधीश एलोन मस्क यांचे OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांच्याशी दीर्घकाळ वाद सुरू आहे. अशा स्थितीत सुचीर यांच्या मृत्यूशी संबंधित एका पोस्टवर मस्कने जरी केले आणि 'हम्म' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ही पोस्ट वर दिलेल्या लिंकमध्ये पाहू शकता.

]]>
Best OTT Series For Weekend: 2024 मध्ये ‘या’ जबरदस्त सिरीज आणि चित्रपटांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, पहा यादी   https://www.digit.in/mr/news/entertainment/list-of-the-best-ott-series-and-movies-of-2024-that-you-can-watch-on-the-weekend.html https://www.digit.in/mr/news/entertainment/list-of-the-best-ott-series-and-movies-of-2024-that-you-can-watch-on-the-weekend.html Sat, 14 Dec 2024 06:00:00 +0530

मनोरंजन विश्वात 2024 हे वर्ष अगदी विशेष ठरले आहे. या वर्षी अनेक अप्रतिम वेब सिरीज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात मने जिंकली आहेत. बॉलीवूड, दक्षिण भारतीय चित्रपट आणि विविध प्रकारच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 2024 मध्ये रिलीज झालेल्या बेस्ट OTT सिरीजबद्दल माहिती देणार आहोत. तसेच, आम्ही तुमच्यासाठी या यादीमध्ये गुगल इंडियानुसार 2024 मधील टॉप सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांबद्दल देखील माहिती दिली आहे.

Stree 2

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव अभिनित 'स्त्री' या हॉरर फिल्मने काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केले. त्यानंतर, अलीकडेच या चित्रपटाचा दुसरा भाग 'स्त्री 2' भारतात रिलीज झाला. हा एक धडकी भरवणारा आणि मजेदार चित्रपट आहे, जो पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांना आवडला होता. यात नवीन कथा आणि अनेक मनोरंजक ट्विस्ट आहेत. हा चित्रपट चंदेरी नावाच्या ठिकाणी राहणाऱ्या एका फिरत्या भुताची कथा आहे. सध्या Amazon Prime Video वर हा चित्रपट पाहता येईल.

Heeramandi

'हिरामंडी' ही वेब सिरीज प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा एक पीरियड ड्रामा आहे. ही सिरीज 2024 या वर्षातील सर्वात महागडी आणि मोठ्या प्रमाणात पाहिलेली सिरीज आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसिरीजची कथा पाकिस्तानातील लाहोरमधील हीरा मंडी रेड लाईट एरियातील गणिकांच्या जीवनावर आधारित आहे. या सिरीजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल मेहता आणि ताहा शाह बदुशा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिरीजमध्ये 1940 च्या दशकातील भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला गुप्तपणे मदत करणारे, भव्यता आणि देशभक्ती यांचे मिश्रण करणारे गणिका चित्रित करतात. ही सिरीज Netflix वर उपलब्ध आहे.

The Family Man Season 3

श्रीकांत तिवारीला ईशान्य भारतात बायोवारफेअर ट्विस्टसह नवीन धोक्यांचा सामना करावा लागतो. या सीझनमध्ये राजकीय षडयंत्राला भावनिक कौटुंबिक गतिशीलता, अभिनेता मनोज बाजपेयी यांची सूक्ष्म कामगिरी आणि या प्रदेशातील आश्चर्यकारक व्हिज्युअल्सची जोड दिली आहे. श्रीकांत आपल्या पत्नीसोबतचे विस्कळीत नाते सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि देशाच्या रक्षणासाठीही काम करेल. या सीझनमध्ये श्रीकांतच्या आयुष्यात अनेक नवीन प्रसंग आणि अडचणी येतील. ही सिरीज Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

Laapataa Ladies

किरण राव दिग्दर्शित Laapataa Ladies हा एक विनोदी चित्रपट, ग्रामीण भारतातील बेपत्ता झालेल्या दोन वधूंवर आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी देखील नामांकन मिळाले आहे. हा चित्रपट Netflix वर देखील पाहण्यासाठी उपलब्ध आहे. चित्रपटाची निर्मिती राव, आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

The Greatest of All Time

The Greatest of All Time हा एक ऍक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात साऊथ प्रसिद्ध अभिनेता विजय मुख्य भूमिकेत आहे, जो एजंटची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अनेक वर्षांच्या यशस्वी ऑपरेशननंतर, एक उच्चभ्रू एजंट अचानक निवृत्त होतो आणि शांत, सामान्य जीवन निवडतो. मात्र, जेव्हा भूतकाळातील मिशन त्याला त्रास देण्यासाठी परत येतो, तेव्हा आपत्ती टाळण्यासाठी तो त्याच्या संघासह पुन्हा एकत्र येतो. हा चित्रपट Netflix वर उपलब्ध आहे.

Mirzapur Season 3

Mirzapur या सिरीजचा दोन सिझनच्या यशानंतर Mirzapur Season 3 देखील मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. यामध्ये पूर्वांचलमधील त्रिपाठींची राजवट संपली. गुड्डू आणि गोलू यांनी सिंहासनावर दावा केल्यामुळे ते एका नवीन दावेदाराविरुद्ध उभे आहेत. या सिरीजला imdb वर 8.4 रेटिंग मिळाली आहे. अली फझल, रसिक गुगल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. ही सिरीज Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

Gullak Season 4

या स्लाइस-ऑफ-लाइफ सिरीजमध्ये मिश्रा कुटुंबाचे मध्यमवर्गीय संघर्ष विनोद आणि प्रेम दाखवण्यात आले आहे. या सिरीजमध्ये या कुटुंबाला नगर निगमकडून नोटीस मिळते की त्यांचे घर नकाशाचे पालन करत नाही आणि ते पाडले जाऊ शकते. संतोष मिश्रा या समस्येचे निराकरण करण्यासाठी नगर निगमच्या अधिकाऱ्याला लाच देण्यास अनिच्छेने सहमत आहे. जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता, हर्ष मयार, शिवंकित सिंग परिहार, सुनिता राजवार, साद बिलग्रामी, गौरव सराठे इ. कलाकार या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

]]>
Pushpa 2 OTT Release Date: अल्लू अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटाच्या OTT रिलीजची प्रतीक्षा, कुठे आणि कधी पाहता येईल?  https://www.digit.in/mr/news/entertainment/pushpa-2-ott-release-date-check-platform-when-and-where-to-watch.html https://www.digit.in/mr/news/entertainment/pushpa-2-ott-release-date-check-platform-when-and-where-to-watch.html Fri, 13 Dec 2024 14:34:00 +0530

Pushpa 2 OTT Release Date: भारतीय साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पोहोचल्यानंतर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. देशभरातील चाहत्यांनी चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असताना, चाहते Pushpa 2 चित्रपटाच्या OTT रिलीजबद्दल बोलत आहेत. जाणून घेऊयात चित्रपटाच्या OTT रिलीजबद्दल सर्व माहिती-

Also Read: BSNL Winter Bonanza Offer: दर महिन्याला मिळेल तब्बल 1300GB डेटा आणि Unlimited बेनिफिट्स

Pushpa 2 OTT Release Date

Pushpa 2 OTT रिलीजची तारीख अद्याप अज्ञात आहे. परंतु, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix ने वापरकर्त्यांना सूचित करण्यासाठी एक पोस्टर जारी केले होते. या पोस्टमध्ये शेअर करण्यात आले आहे की, 'Pushpa 2: The Rule' लवकरच तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह विविध भाषांमध्ये प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

pushpa 2 : the rule

त्याबरोबरच, पुष्पा 2 चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, पुढे आलेल्या अहवालानुसार पुष्पा 2 चे OTT अधिकार 275 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी करण्यात आले आहेत.

Pushpa 2 च्या कास्टबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपट अल्लू अर्जुन, मास्टर ध्रुवन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगदीश प्रताप बंदरी, जगपती बाबू, सुनील, अनसूया भारद्वाज, राव रमेश, षणमुख, सत्य, तारक पोनप्पा, अजय आणि बरेच कलाकार या मेगा ब्लॉकबस्टरचा भाग आहेत. पुढे आलेल्या अहवालानुसार, असाही दावा करण्यात आला आहे की, चाहते लवकरच Netflix वर Pushpa 1 आणि Pushpa 2 पाहण्यास सक्षम असतील.

]]>
BSNL Winter Bonanza Offer: दर महिन्याला मिळेल तब्बल 1300GB डेटा आणि Unlimited बेनिफिट्स https://www.digit.in/mr/news/telecom/bsnl-winter-bonanza-offer-get-1300gb-data-and-unlimited-benifits-check-price.html https://www.digit.in/mr/news/telecom/bsnl-winter-bonanza-offer-get-1300gb-data-and-unlimited-benifits-check-price.html Fri, 13 Dec 2024 13:21:00 +0530

BSNL Winter Bonanza Offer: भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ग्राहकांना आकर्षित करण्यात अनेक ऑफर्स सादर करत असते. आता कंपनीने आपल्या युजर्ससाठी विशेष Winter Bonanza Offer आणली आहे. या ऑफरअंतर्गत लोकप्रिय कंपनीने एक अप्रतिम प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दर महिन्याला तब्बल 1300GB हायस्पीड डेटा मिळेल. BSNLची ही ऑफर देशातील बहुतांश मंडळांसाठी उपलब्ध आहे. मात्र, दिल्ली आणि मुंबईतील वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. वाचा सर्व तपशील-

bsnl last day offer 3 month validity

BSNL Winter Bonanza Offer

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने त्यांच्या ब्रॉडबँड सर्व्हिस भारत फायबरसाठी विंटर बोनान्झा ऑफर सादर केली आहे. यामध्ये यूजर्सना सहा महिन्यांसाठी 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सुपरफास्ट FTTH इंटरनेटची सुविधा मिळणार आहे. या संपूर्ण प्लॅनची ​​किंमत 1,999 रुपये आहे.

या ऑफरअंतर्गत भारत फायबर वापरकर्त्यांना दरमहा 1300GB सुपरफास्ट FTTH इंटरनेट मिळत आहे. त्याबरोबरच, इंटरनेटचा वेग 25Mbps असेल. वापरकर्ते सहा महिन्यांसाठी दरमहा तब्बल 1300GB डेटा वापरू शकतील. 1300GB डेटा संपल्यानंतरही युजर्स 4Mbps स्पीडने इंटरनेट वापरण्यास सक्षम असतील. याव्यतिरिक्त, या कालावधीत युजर्स या ऑफरअंतर्गत अनलिमिटेड लँडलाईन कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

प्लॅनमधील उपलब्ध डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, सहा महिन्यांच्या वैधतेदरम्यान या ऑफरअंतर्गत यूजर्सना दरमहा 333 रुपयांमध्ये 1300GB डेटा मिळतोय. तसेच, अमर्यादित लँडलाइन कॉल्सची सुविधा देखील मिळणार आहे. हा प्लॅन अशा युजर्ससाठी उपयुक्त आहे, जे मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात. तसेच, मोठ्या प्रमाणात कॉल्स करतात, अशा युजर्ससाठी ही ऑफर खूप उपयुक्त आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अलीकडेच BSNL ने एक नवीन डायरेक्ट-टू-डिव्हाइस D2D सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत वापरकर्ते मोबाईल नेटवर्कशिवायही लोकांना कॉल आणि मेसेज करू शकतील.

]]>
आकर्षक TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची भारतात सुरु! कमी किमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/tecno-phantom-v-fold-2-and-v-flip-2-first-sale-starts-in-india-check-special-price-here.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/tecno-phantom-v-fold-2-and-v-flip-2-first-sale-starts-in-india-check-special-price-here.html Fri, 13 Dec 2024 12:44:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने अलीकडेच आपले नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स TECNO Phantom V Fold 2 आणि TECNO Phantom V Flip 2 भारतात लाँच केले आहेत. दरम्यान, आज 13 डिसेंबरपासून या Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 दोन्ही फोन्सची विक्री भारतात सुरु झाली आहे. टेक्नोचे नवीन फोल्डेबल स्मार्टफोन आज पहिल्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ही सेल आज दुपारी 12 वाजतापासून प्रसिद्ध इ-कॉमर्स Amazon India साईटवर लाईव्ह झाली आहे. पाहुयात TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Also Read: Best Smartphones Under 25000: 2024 मध्ये किफायतशीर किमतीत लाँच झालेले टॉप 5 फोन्स, पहा यादी

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 वरील ऑफर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता TECNO PHANTOM V Flip 2 ची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, PHANTOM V Fold 2 79,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, वर नमूद केलेल्या किमती विशेष लाँच प्राईस आहेत. या किमतीतील स्मार्टफोन मर्यादित काळासाठी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

त्यानंतर, हा फोन मूळ किमतीसह खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात येईल. त्याबरोबरच, या पहिल्या सेलमध्ये हा फोन EMI आणि एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध असेल. फ्लिप स्मार्टफोन कर्स्ट ग्रीन आणि रिपलिंग ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येईल. तर, फोल्डेबल स्मार्टफोन मूनडस्ट ग्रे आणि ट्रॅव्हर्टाइन ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल.

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2

डिस्प्ले

TECNO PHANTOM V Fold 2 मध्ये 7.85 इंच लांबीचा मुख्य LTPO AMOLED डिस्प्ले आहे. तर, 6.42 इंच लांबीच्या इनर LTPO AMOLED डिस्प्लेसह येईल. तर, PHANTOM V Flip 2 फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा मुख्य LTPO AMOLED डिस्प्ले आहे. तर, 3.64 इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले मिळेल.

प्रोसेसर

स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी, कंपनीने फोल्डेबल फोनमध्ये Octa Core MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, फ्लिप स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8020 6nm प्रोसेसरसह येतो.

स्टोरेज

दोन्ही स्मार्टफोन एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये येतात. फोल्डेबल फोन 12GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. तसेच, फ्लिप फोनमध्ये देखील 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅमचा पर्याय मिळेल.

Tecno-Phantom-V-Flip-2.jpg
Tecno-Phantom-V-Flip-2.jpg

कॅमेरा

नवीन फोल्डेबल स्मार्टफोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनच्या पुढील बाजूस 32MP मुख्य आणि 32MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा उपलब्ध आहे.

त्याबरोबरच, फ्लिप फोनमध्ये 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओसाठी समोर एक सिंगल 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

बॅटरी

TECNO PHANTOM V Fold 2 मध्ये 5750mAh बॅटरी आहे, जी 15W वायरलेस आणि 70W अल्ट्रा चार्जिंगला सपोर्ट करेल. तर, PHANTOM V Flip 2 मध्ये 4720mAh बॅटरी आहे, जी 70W अल्ट्रा चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी, दोन्ही फोनमध्ये USB TYpe-C चार्जिंग पोर्ट देण्यात मिळेल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
Best Smartphones Under 25000: 2024 मध्ये किफायतशीर किमतीत लाँच झालेले टॉप 5 फोन्स, पहा यादी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-smartphones-launched-in-india-under-rs-25000-in-2024-check-top-5-phones.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-smartphones-launched-in-india-under-rs-25000-in-2024-check-top-5-phones.html Fri, 13 Dec 2024 11:31:00 +0530

Best Smartphones Under 25000: 2024 वर्ष संपायला आता फक्त्त काही दिवस उरले आहेत. या वर्षी सुप्रसिद्ध स्मार्टफोन्स कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत निरनिराळे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या वर्षी स्मार्टफोन्सच्या केवळ डिझाईनमध्येच नाही तर, फीचर्समध्ये देखील अधिक नाविन्यपूर्ण कामगिरी दिसली. Samsung, Realme पासून Redmi पर्यंत अनेक कंपन्यांनी प्रत्येक बजेटमध्ये स्मार्टफोन लाँच केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, या वर्षी 25000 रुपयांच्या अंतर्गत लाँच झालेल्या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात यादी-

Also Read: Best 50MP Camera Smartphones under 7000: कमी किमतीत उत्तम कॅमेरासह येतात ‘हे’ स्मार्टफोन्स, पहा यादी

Lava Agni 3

Lava AGNI 3 Launch

सर्वप्रथम आपण देशी स्मार्टफोन निर्माता Lava च्या नवीनतम स्मार्टफोन Lava Agni 3 बद्दल जाणून घेऊयात. हा स्मार्टफोन कंपनीने ऑक्टोबर महिन्यात लाँच केला होता. Lava Agni 3 स्मार्टफोन कंपनीने 19,999 रुपयांना सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने अनेक विशेषतांनी सज्ज केला आहे. खरं तर, हा एक सामान्य स्मार्टफोन आहे, परंतु फोनमध्ये तुम्हाला ड्युअल डिस्प्ले मिळणार आहे. Lava Agni 3 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, यात कॅमेरा मॉड्यूलच्या उजव्या बाजूला 1.7-इंच AMOLED सेकंडरी पॅनेल देखील आहे.

Motorola Edge 50 Fusion

motorola edge 50 fusion

Motorola Edge 50 Fusion हा स्मार्टफोन Motorola ने मे महिन्यात लाँच केला होता. हा स्मार्टफोन 22,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आला होता. फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD 3D कर्व पोलइडी डिस्प्ले मिळतो. तसेच, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेटद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे.

Realme 13+ 5G

Realme 13+ 5G स्मार्टफोनया यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये लाँच करण्यात आला होता. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेराने मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

OnePlus Nord CE4

OnePlus Nord 4 5G best camera phones
OnePlus Nord 4 5G

फ्लॅगशिप किलर OnePlus ने OnePlus Nord CE4 स्मार्टफोन देखील अलीकडेच लाँच केला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. हा फोन 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5500mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, जी 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते.

iQOO Z9s Pro

Best Smartphones Under 25000

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा नवा स्मार्टफोन iQOO Z9s Pro फोन देखील अलीकडेच भारतात लाँच केला गेला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO Z9s Pro स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.

]]>
Redmi Note 14 Series First Sale: नवीनतम स्मार्टफोन सिरीजची पहिली सेल भारतात आज, पहा Best ऑफर्स https://www.digit.in/mr/news/mobile-phones/redmi-note-14-5g-series-first-sale-today-in-india-check-price-and-best-offers.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/redmi-note-14-5g-series-first-sale-today-in-india-check-price-and-best-offers.html Fri, 13 Dec 2024 09:51:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ची नवी Redmi Note 14 5G सिरीज नुकतेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या फोनची विक्री आजपासून भारतीय बाजारात सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान या सिरीजमधील स्मार्टफोन स्वस्तात डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीने या सीरीज अंतर्गत Redmi Note 14 5G, Redmi Note 14 Pro 5G आणि Redmi Note 14 Pro+ 5G असे तीन स्मार्टफोन सादर केले. हे तीन स्मार्टफोन वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी दाखल होणार आहेत.

Also Read: Best 50MP Camera Smartphones under 7000: कमी किमतीत उत्तम कॅमेरासह येतात ‘हे’ स्मार्टफोन्स, पहा यादी

Redmi-Note-14-5G

Redmi Note 14 5G सिरीजची पहिली विक्री

Redmi Note 14 5G ची विक्री Amazon वर आज दुपारी 12 वाजता सुरू होईल. तर, Redmi Note 14 Pro 5G आणि Redmi Note 14 Pro+ 5G ची विक्री Flipkart वर 12 वाजता सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये, या सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 1000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास उपलब्ध आहे.

Redmi Note 14 5G ची किंमत:

  • 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत = 18,999 रुपये आणि
  • 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत = 20,999 रुपये.

Redmi Note 14 Pro 5G ची किंमत:

8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत = 23,999 रुपये आणि

8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत = 25,999 रुपये

Redmi Note 14 Pro+ 5G ची किंमत

  • 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत= 29,999 रुपये
  • 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत = 31,999 रुपये आणि
  • 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत = 34,999 रुपये

Redmi Note 14 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 14 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर मिळणार आहे. त्याबरोबरच, हा फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 20MP फ्रंट कॅमेरासह येतो. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5,110mAh च्या मजबूत बॅटरीने सुसज्ज आहे.

Redmi Note 14 Pro

Redmi Note 14 Pro 5G मध्ये 6.67 इंच OLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेट उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये 50MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत, तर 20MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 14 Pro+ मध्ये 6.67 इंच लांबीचा OLED कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. या फोनमध्ये देखील तुम्हाला 50MP मुख्य कॅमेरा आणि 20MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी, हा हँडसेट 6200mAh बॅटरीसह येतो.

]]>
Best 50MP Camera Smartphones under 7000: कमी किमतीत उत्तम कॅमेरासह येतात ‘हे’ स्मार्टफोन्स, पहा यादी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-50mp-camera-smartphones-under-7000-rs-check-list.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-50mp-camera-smartphones-under-7000-rs-check-list.html Fri, 13 Dec 2024 06:00:00 +0530

Best 50MP Camera Smartphones under 7000: तुम्ही सुद्धा नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात. पण तुमचे बजेट कमी आहे? तर अजिबात काळजी करू नका. कारण अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी सध्या बाजारात अगदी कमी किमतीत उत्तम स्मार्टफोन्स सादर केले आहेत. अगदी 6000 ते 7000 रुपयांच्या दरम्यान खरेदीसाठी अनेक स्मार्टफोन पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा, मजबूत बॅटरी आणि मोठा डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात 7000 रुपयांअंतर्गत 50MP कॅमेरासह येणारे बेस्ट स्मार्टफोन्स-

Also Read: WhatsApp Update: आता लवकरच स्वतःच ट्रान्सलेट होतील मॅसेजेस, लवकरच येतोय महत्त्वाचे नवा फिचर!

POCO C61

Best 50MP Camera Smartphones under 7000

POCO C61 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 5,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Poco च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, हा स्मार्टफोन MediaTek Helio G36 प्रोसेसरने देखील सुसज्ज आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M05

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung चे अनेक बजेट स्मार्टफोन्स पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी, Samsung Galaxy M05 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 6,999 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. सुरळीत कामकाजासाठी, हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

POCO C65

poco c65
POCO C65

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco चा बजेट स्मार्टफोन POCO C65 ची किंमत 6,799 रुपये इतकी आहे. POCO C65 हा एक बजेट स्मार्टफोन आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात मोठा 6.74-इंच लांबीचा डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरद्वारे सज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल-लेन्स रियर कॅमेरा सिस्टम आहे, त्यासह 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5000mAh बॅटरीला देखील सपोर्ट करतो.

]]>
WhatsApp Update: आता लवकरच स्वतःच ट्रान्सलेट होतील मॅसेजेस, लवकरच येतोय महत्त्वाचे नवा फिचर!  https://www.digit.in/mr/news/apps/whatsapp-new-translate-message-and-update-feature-will-roll-out-soon-check-details.html https://www.digit.in/mr/news/apps/whatsapp-new-translate-message-and-update-feature-will-roll-out-soon-check-details.html Thu, 12 Dec 2024 16:47:00 +0530

WhatsApp Update: WhatsaApp आपल्या युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे फीचर्स लवकरच सादर करणार आहे. नव्या फीचर्सद्वारे ते येणाऱ्या काळात चॅटमधील मेसेजेसचे कोणत्याही भाषेत सहज ट्रान्सलेशन करू शकतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp ची ही नवी सुविधा आल्याने भाषिक अडथळे दूर होऊन संवाद साधणे सोपे होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या भाषिक मित्रासोबत संवाद करण्यास अडचणी येत असतील, तर हे फिचर तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

Also Read: Finally! बहुप्रतीक्षित Vivo X200 सिरीज अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स

Whatsapp

WhatsaApp ट्रान्सलेट मॅसेजेस अँड अपडेट फीचर

WhatsaApp च्या नव्या ट्रान्सलेट मॅसेजेस अँड अपडेट फीचरबद्दल WhatsaApp फीचर्स आणि ऍक्टिव्हिटीजवर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाईटच्या रिपोर्टमधून माहिती मिळाली आहे. होय, Google Play Store वर उपलब्ध Android 2.24.26.9 बीटा अपडेटवरून असे दिसून आले की, ऍप Google Translate फीचरवर काम करत आहे. ज्याद्वारे संदेश आणि चॅनेल अपडेट्स तुमच्या स्वतःच्या भाषेत ट्रान्सलेट केले जाऊ शकतात. या पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट दिला गेला आहे.

वरील पोस्टमधील स्क्रिनशॉट पाहिल्यास WhatsaApp च्या मेसेजिंग ॲपमध्ये एक विंडो दिसते, ज्यामध्ये ट्रान्सलेशनचा पर्याय दिसेल. या फिचरच्या मदतीने, चॅट मॅसेज आणि चॅनेल अपडेट्स इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट करता येतील. यासोबतच, ऑटो ट्रान्सलेशनचा पर्याय देखील मिळणार आहे. जो ऑन केल्यानंतर मॅसेज आणि अपडेट्स आपोआप ट्रान्सलेट होतील.

याव्यतिरिक्त, हे फिचर तुमच्या गोपनियतेची देखील काळजी घेणार आहे. अहवालात पुढे सांगण्यात आले आहे की, ही प्रक्रिया अशा प्रकारे होईल, जेणेकरून वापरकर्त्यांचा डेटा कोणत्याही थर्ड पार्टी किंवा इतर सर्व्हरवर संग्रहित केला जाणार नाही. तसेच, युजर्सच्या चॅट्स देखील कधीही लीक होणार नाहीत. सध्या या फीचरवर काम सुरू असून येत्या काही दिवसांत हे फीचर बीटा युजर्ससाठी ट्रायल म्हणून रिलीज केले जाईल.

]]>
Finally! बहुप्रतीक्षित Vivo X200 सिरीज अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-vivo-x200-series-launched-in-india-check-price-and-top-5-features.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-vivo-x200-series-launched-in-india-check-price-and-top-5-features.html Thu, 12 Dec 2024 14:34:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या नव्या Vivo X200 सीरीजच्या लाँचची प्रतीक्षा भारतात दीर्घकाळापासून सुरु होती. दरम्यान, कंपनीने आज अखेर ही सिरीज भारतात लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात ही सिरीज सादर करण्यात आली होती. या लाइनअपमध्ये Vivo X200 आणि Vivo X200 Pro यांचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये MediaTek Dimensity 9400 चिप देण्यात आली आहे. त्याचे प्रो मॉडेल म्हणजे Vivo X200 Pro मध्ये 200MP कॅमेरा आहे. जाणून घेऊयात Vivo X200 सिरीजची किंमत आणि टॉप 5 फीचर्स-

Also Read: फक्त 8000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झाले नवे Smart TV, मोठ्या टीव्हीसह घ्या थिएटरची मज्जा!

Vivo X200 सिरीज भारतात लाँच

नवीनतम Vivo X200 फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 12GB RAM + 256GB आणि 16GB RAM + 512GB स्टोरेज मॉडेलमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मटफोनची किंमत अनुक्रमे 65,999 रुपये आणि 71,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

तर, दुसरीकडे या सिरीजचा टॉप व्हेरिएंट म्हणजेच Vivo X200 Pro फोन 94,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 10% पर्यंत Discount उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही हँडसेटची विक्री Amazon India वर 19 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.

Vivo X200 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Vivo X200 मध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, Vivo X200 Pro मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. वापरकर्त्यांना या स्क्रीनवरून स्मूथ व्हिज्युअल एक्सपेरियन्स मिळेल.

प्रोसेसर

Vivo X200 आणि Vivo X200 Pro मध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर देण्यात आला आहे. या दोन्ही फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. ते दोघेही Android 15 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतात.

Vivo X200 series price

कॅमेरा

Vivo X200 फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. या सेटअपमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50MP Sony IMX921 प्राथमिक सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP टेलिफोटो सेन्सर समाविष्ट आहे. तर, दुसरीकडे फोटोग्राफीसाठी, प्रो व्हेरियंटमध्ये Zeiss द्वारे बनविलेले 200MP APO टेलिफोटो लेन्स, 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

कंपनीने Vivo X200 मध्ये 5800mAh बॅटरी दिली आहे. तर, X200 Pro मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे. दोन्ही फोनची बॅटरी 90W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येते.

इतर

दोन्ही फोनमधील उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

]]>
फक्त 8000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झाले नवे Smart TV, मोठ्या टीव्हीसह घ्या थिएटरची मज्जा!  https://www.digit.in/mr/news/tvs/new-daiwa-32-and-43-inch-smart-tv-launched-in-india-check-price-and-all-details.html https://www.digit.in/mr/news/tvs/new-daiwa-32-and-43-inch-smart-tv-launched-in-india-check-price-and-all-details.html Thu, 12 Dec 2024 12:01:00 +0530

प्रसिद्ध टेक जायंट Daiwa ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली Smart TV लाँच केले आहेत. हे कुलीटा स्मार्ट टीव्ही 32-इंच आणि 43-इंच डिस्प्ले साईजमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीने हे स्मार्ट टीव्ही अगदी कमी किमतीत सादर केले आहेत. हे टीव्ही स्लिम बेझल आणि क्वाड-कोर प्रोसेसर, आय-केअर मोड, ऍपल एअरप्ले सपोर्ट यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज आहेत. जाणून घेऊयात या नवीन Daiwa TV ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Lava O3 Pro: देशी कंपनीचा नवा स्मार्टफोन Powerful फीचर्ससह होणार लाँच! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी

नव्या Daiwa स्मार्ट टीव्हीची किंमत

नवीन Daiwa 32-इंच लांबीचा HD रेडी टीव्ही मॉडेल क्रमांक D32H1COC स्मार्ट टीव्ही 7,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, Daiwa 43-इंच लांबीचा फुल HD टीव्ही मॉडेल क्रमांक D43F1COC स्मार्ट टीव्ही 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे स्मार्ट टीव्ही 1 वर्षाची वॉरंटी आणि बँक ऑफरसह Flipkart वरून खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

32-inch and 43 inch daiwa Smart TV launched

Daiwa स्मार्ट टीव्हीचे सर्व तपशील

Daiwa चे नवे 32-इंच आणि 43-इंच दोन्ही स्मार्ट टीव्ही मॉडेल्स स्लिम बेझल्ससह एज-टू-एज डिझाइनसह येतात. हे स्मार्ट टीव्ही एक इमर्सिव्ह व्युइंग एक्सपेरियंस प्रदान करतात. दोन्ही मॉडेल्समध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे, जो टीव्ही शो, चित्रपट आणि गेम्ससह बहुतेक कंटेंटसाठी चांगली स्पीड सुनिश्चित करतो. यात टीव्हीमधेय सात पिक्चर मोड आहेत, जे वापरकर्त्यांना कंटेंट टाईपनुसार उदा. मुव्ही, गेम्स, स्पोर्ट्स इ. पिक्चर सेटिंग्ज समायोजित करण्यास अनुमती देतात.

याव्यतिरिक्त, या टीव्हीमध्ये दोन बॉक्स स्पीकर आहेत, जे एकूण 20W ऑडिओ आउटपुट देतात. हे टीव्ही तुमच्या लिव्हिंग रूम किंवा बेडरूमसाठी उत्तम साउंड एक्सपेरियन्स सुनिश्चित करतात. दोन्ही मॉडेल्समध्ये क्वाड-कोर प्रोसेसर आहे, जो सुरळीत कामगिरी, मल्टीटास्किंग आणि जलद प्रतिसाद देतो. विशेष म्हणजे Daiwa स्मार्ट टीव्ही प्री-लोडेड OTT प्लॅटफॉर्म्स उदा. Prime Video, Sony LIV, ZEE 5 आणि You-Tube सह येतात, जे तुम्हाला चित्रपट, शो आणि व्हिडिओंमध्ये सहज ऍक्सेस देतात.

]]>
Lava O3 Pro: देशी कंपनीचा नवा स्मार्टफोन Powerful फीचर्ससह होणार लाँच! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/new-lava-o3-pro-listed-on-amazon-under-rs-7000-know-all-details.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/new-lava-o3-pro-listed-on-amazon-under-rs-7000-know-all-details.html Thu, 12 Dec 2024 10:55:00 +0530

Lava O3 Pro: भारतातील एकमेव स्मार्टफोन निर्माता Lava ने अलीकडेच नवा स्मार्टफोन Amazon India च्या वेबसाईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव Lava O3 Pro फोन असे आहे. या फोनची किंमत आणि सर्व फीचर्स Amazon लिस्टिंगद्वारे उघड झाले आहेत. हा कंपनीचा नवा बजेट रेंज स्मार्टफोन आहे. कमी किमतीत तुम्हाला फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल. चला तर मग जाणून घ्या Lava O3 Pro फोनची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Jio New Year Welcome Plan: कंपनीने लाँच केला 2025 चा नवा प्लॅन, मिळतील Unlimited बेनिफिट्स!

Lava O3 Pro ची किंमत

आम्ही तुम्हाला सांगतो की, Lava कंपनीचा Lava O3 Pro फोन Amazon वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, या फोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत फक्त 6,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 2000 रुपयांची सवलतीचे ऑफर्स उपलब्ध आहेत. कंपनीने हा फोन ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी व्हाईट आणि ग्लॉसी पर्पल या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Lava O3 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Amazon लिस्टिंगद्वारे या फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. त्यानुसार, प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Lava O3 Pro फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले मिळणार आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. उत्तम कामकाजासाठी, हा फोन Unisoc T606 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेज आहे. तर, या फोनमध्ये 4GB व्हर्चुअल रॅमसाठी वेगळे समर्थन देखील आहे.

lava o3 pro features

फोटोग्राफीसाठी आगामी फोनमध्ये LED फ्लॅशसह 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय फोनमध्ये फेस अनलॉक फीचर देखील आहे. हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो.

]]>
Jio New Year Welcome Plan: कंपनीने लाँच केला 2025 चा नवा प्लॅन, मिळतील Unlimited बेनिफिट्स! https://www.digit.in/mr/news/telecom/jio-new-year-welcome-plan-of-rs-2025-with-long-term-validity-and-unlimited-benifits.html https://www.digit.in/mr/news/telecom/jio-new-year-welcome-plan-of-rs-2025-with-long-term-validity-and-unlimited-benifits.html Thu, 12 Dec 2024 09:33:00 +0530

Jio New Year Welcome Plan: भारतातील आघाडीची दिग्गज Jio दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची आकर्षक ऑफर सादर करते. अवघ्या काही दिवसांनी नवीन वर्ष सुरु होणार आहे. नेहमीप्रमाणे, यावर्षीही कंपनीने न्यू इयर वेलकम प्लॅन अंतर्गत नवीन प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने या प्लॅनची ​​किंमत 2025 रुपये इतकी निश्चित केली आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 200 दिवसांपर्यंत वैधता मिळणार आहे. यासोबतच प्लॅनमध्ये अनेक रोमांचक फायदे आणि ऑफर्स समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे लक्षात घ्या की, हा प्लॅन केवळ मर्यादित कालावधीसाठी ऑफर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सर्व बेनिफिट्स-

Jio New Year Welcome Plan

वर सांगितल्याप्रमाणे, Jio च्या या नवीन वर्षाच्या वेलकम प्लॅनची किंमत 2025 रुपये इतकी आहे. नवीन वर्ष 2025 साजरे करण्यासाठीच हा विशेष प्लॅन सादर करण्यात आला आहे. तुमच्या माहीतीसाठी सांगतो की, हा न्यू इयर प्लॅन मर्यादित कालावधीसाठीच ऑफर करण्यात आला आहे. ही ऑफर आज 11 डिसेंबर ते 11 जानेवारी 2025 पर्यंत लाईव्ह असेल. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!

Jio New Year Welcome Plan

नव्या प्लॅन्सचे सर्व बेनिफिट्स

बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio च्या या प्लॅनमध्ये 200 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. हा दीर्घकालीन वैधतेसह येणारा विशेष प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा लाभ मिळेल. एवढेच नाही तर, यात अमर्यादित 5G डेटाची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल.

होय, या प्लॅनद्वारे तुम्ही कोणत्याही नंबरवर तब्बल 200 दिवसांपर्यंत अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेण्यास सक्षम असाल. या प्लॅनसह तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स देखील मिळणार आहेत:

  • तुम्हाला AJIO, Swiggy आणि EaseMyTrip प्लॅटफॉर्मवर 2,150 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन मिळतील.
  • तुम्ही AJIO वर 500 रुपयांचे कूपन अप्लाय करू शकता. तर, Swiggy साठी 150 रुपयांचे कूपन उपलब्ध मिळेल.
  • EaseMyTrip फ्लाइट्सवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
]]>
नवीनतम CMF Phone 1 वर मिळतोय मोठ्या प्रमाणात Discount, जाणून घ्या Best ऑफर्स  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-cmf-phone-1-with-huge-discount-from-flipkart-check-best-offers.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-cmf-phone-1-with-huge-discount-from-flipkart-check-best-offers.html Thu, 12 Dec 2024 06:00:00 +0530

CMF Phone 1 हा CMF कंपनीचा पहिला वहिला स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहोत. जर तुम्ही CMF फोन 1 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या या फोनवर प्रचंड सूट मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोन कंपनीने अगदी बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. होय, हा फोन ई-कॉमर्स साइट Flipkart वर 3,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये कमी किमतीत जबरदस्त फीचर्स आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात CMF Phone 1 ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Amazon सेलदरम्यान Realme चे स्मार्टफोन्स झाले स्वस्त! हजारो रुपयांची बचत करण्याची संधी

CMF Phone 1

CMF Phone 1 ची किंमत

CMF फोन 1 चा 6GB RAM/128GB व्हेरिएंट सध्या ई-कॉमर्स साइट Flipkart वर 14,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटवर 2000 रुपयांची सूट मिळू शकते. यासह, या फोनवर सध्या एकूण 3,000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरच्या बाबतीत, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी उपलब्ध असेल. तर, या फोनवर तुम्हाला 8,600 रुपयांची सूट देखील मिळत आहे. लक्षात घ्या की, एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त लाभ तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

CMF Phone 1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

#image_title

CMF फोन 1 मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 5G प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Nothing OS 2.6 वर कार्य करतो. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP कॅमेरा आहे. तर, समोर 16MP चा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
Amazon सेलदरम्यान Realme चे स्मार्टफोन्स झाले स्वस्त! हजारो रुपयांची बचत करण्याची संधी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-realme-smartphones-with-huge-disocunt-from-amazon-sale-check-here-best-deals.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-realme-smartphones-with-huge-disocunt-from-amazon-sale-check-here-best-deals.html Wed, 11 Dec 2024 16:38:00 +0530

Realme चे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लोकप्रिय आहे. कारण, आजपासुन Amazon India वर Realme साठी विशेष सेल लाइव्ह झाला आहे. Realme Performance Weak सेल केवळ 11 डिसेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत लाईव्ह असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान तुम्ही प्रीमियम श्रेणीचे Realme फोन ते बजेट श्रेणीचे फोन सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. या सेल दरम्यान फोन खरेदी केल्यास तुमची हजारो रुपयांची बचत होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Realme स्मार्टफोन्सवरील सर्व ऑफर्स-

Also Read: आगामी Vivo X200 सिरीजची लाँचपूर्वीच किंमत Leak! तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवीन फोन?

Realme GT 7 Pro

realme gt 7 pro

Realme GT 7 Pro हा स्मार्टफोन कंपनीने अलिडकेच भारतात लाँच केला जाणार आहे. Amazon च्या Realme सेल दरम्यान, Realme GT 7 Pro स्मार्टफोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 59,998 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, EMI आणि एक्सचेंज ऑफरचा पर्याय देखील यासह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Realme NARZO N65 5G

realme narzo n65 5g
realme narzo n65 5g

Realme सेल दरम्यान तुम्ही Realme NARZO N65 5G स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट केवळ 11,498 रुपयांमध्ये खरेदी करण्यास सक्षम आहेत. या फोनच्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Realme GT 6T 5G

Realme GT 6T
Realme GT 6T

Amazon च्या Realme सेलदरम्यान तुम्ही Realme GT 6T 5G स्मार्टफोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 35,998 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर तब्बल 6000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. यावर EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे, 1,745 रुपयांपासून या फोनचे EMI सुरु होईल. एक्सचेंज ऑफरसह तुम्हाला 21,900 रुपयांची सूट मिळू शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
आगामी Vivo X200 सिरीजची लाँचपूर्वीच किंमत Leak! तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवीन फोन?  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-vivo-x200-series-india-price-leak-ahead-on-launch-know-details.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-vivo-x200-series-india-price-leak-ahead-on-launch-know-details.html Wed, 11 Dec 2024 16:05:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Vivo ची Vivo X200 सीरीज भारतात उद्या म्हणजेच 12 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या सीरीजअंतर्गत कंपनी Vivo X200 आणि Vivo X200 Pro मॉडेल लाँच करू शकते. हे स्मार्टफोन्स आधीच चीनच्या बाजारात लाँच करण्यात आले आहेत. दरम्यान ताज्या लीकमध्ये, लाँचच्या तोंडावरच या स्मार्टफोन सिरीजची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात Vivo X200 सिरीज तुमच्या बजेटमध्ये बसेल की नाही?

Also Read: Price Drop! 50MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy F55 5G वर तब्बल 6000 रुपयांची घसरण

Vivo X200 सिरीजची किंमत लीक

प्रसिद्ध टीपस्टर अभिषेक यादवने आपल्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये Vivo X200 सिरीजची भारतीय किंमत लीक झाली आहे. लीकनुसार, Vivo X200 फोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 65,999 रुपये असण्याची शक्यता आहे. तर, 16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 71,999 रुपये असू शकते.

तुम्ही वर दिलेल्या लिंकमध्ये लीक किंमत पाहू शकता. तर दुसरीकडे, सिरीजच्या टॉप मॉडेल Vivo X200 Pro स्मार्टफोनची किंमत 94,999 रुपये असू शकते. लीकनुसार, ही फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत असेल.

Vivo X200 सिरीजचे अपेक्षित तपशील

आगामी Vivo X200 सिरीजच्या अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या सीरिजचे फोन MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतात. Vivo X200 Pro फोन 6000mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह येऊ शकतो, जी 90W फास्ट चार्जिंगसह असेल. तर, प्रो मॉडेल 5,800mAh बॅटरीसह येऊ शकतो, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Vivo X200
Vivo X200

तसेच, Vivo X200 फोटोग्राफीसाठी स्टँडर्ड मॉडेलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX921 प्राथमिक कॅमेरा मिळू शकतो. तर, दुसरीकडे Vivo X200 Pro मध्ये 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP Sony IMX882 टेलिफोटो सेन्सर प्रदान केला जाऊ शकतो. त्याबरोबरच, 200MP Zeiss APO टेलिफोटो सेन्सर प्रो मॉडेलमध्ये आढळण्याची शक्यता आहे.

]]>
Price Drop! 50MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy F55 5G वर तब्बल 6000 रुपयांची घसरण https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-samsung-galaxy-f55-5g-with-discount-from-amazon-get-6000rs-off.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-samsung-galaxy-f55-5g-with-discount-from-amazon-get-6000rs-off.html Wed, 11 Dec 2024 12:31:00 +0530

जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत Samsung चा नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने आपल्या नवीनतम Samsung Galaxy F55 5G च्या किमतीत मोठी घसरण केली आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत 6000 रुपयांची घसरण करण्यात आली आहे. नव्या किमतीसह हा फोन Amazon India आणि अधिकृत वेबसाईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फोनची नवी किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: iQOO 13 First Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल भारतात आजपासून होणार सुरु, पहा ऑफर्स

samsung galaxy f55 5g
samsung galaxy f55 5g

Samsung Galaxy F55 5G ची नवी किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, लेटेस्ट Samsung Galaxy F55 स्मार्टफोन Amazon वर तब्बल 6,100 रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. कंपनी ही सूट या फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटवर देत आहे. हा फोन कंपनीने लाँचच्या वेळी 26,999 रुपयांना सादर केला होता. किमतीततील कपात पाहता, हा फोन सध्या Amazon वर 20,899 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.

तुम्ही बँक कार्डने फोन खरेदी केल्यास, तुम्हाला Amazon वर 2000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. त्याबरोबरच, या फोनवर 17,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे. एवढेच नाही तर, हा फोन कंपनीच्या अधिकृत साइटवर देखील 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy F55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F55 5G वापरकर्त्यांना 120Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.7-इंच लांबीचा HD प्लस सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ब्रँडने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चिपसेट चांगल्या परफॉर्मन्ससाठी दिली. हा प्रोसेसर गेमिंगसह इतर ऑपरेशन्समध्ये चांगला स्पीड प्रदान करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. या डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर तसेच, पाणी आणि धूळ संरक्षणासाठी IP67 रेटिंग मिळेल.

SAMSUNG-Galaxy-F55-5G-
#SAMSUNG-Galaxy-F55-5G

याव्यतिरिक्त, या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राइमरी कॅमेरा लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या डिव्हाइसमध्ये दीर्घकाळ टिकणारी 5000mAh बॅटरी आहे. याला क्विक चार्जिंगसाठी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
iQOO 13 First Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल भारतात आजपासून होणार सुरु, पहा ऑफर्स  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-iqoo-13-first-sale-today-in-india-check-price-and-all-offers-here.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-iqoo-13-first-sale-today-in-india-check-price-and-all-offers-here.html Wed, 11 Dec 2024 11:25:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने नुकतेच भारतीय बाजारात iQOO 13 स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय बाजारात सुरु होती. दरम्यान, आजपासून या स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु होणार आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर दुपारी 12 वाजता ही सेल लाइव्ह होणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर उपलब्ध आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 6000mAh जंबो बॅटरी देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात iQOO 13 ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Myntra Refund Scam: अरे बापरे! जयपूर गॅंगने केली Myntra ची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक, वाचा डिटेल्स

iqoo 13 launched in india

iQOO 13 ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO 13 5G फोन 12GB+256GB आणि 16GB+512GB या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 54,999 रुपये आणि 59,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI आणि HDFC बँकेकडून यावर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे. त्याबरोबरच, 5000 रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. तसेच, या फोनवर परवडणारी EMI देखील आहे.

iQOO 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच लांबीचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे, रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. यात HDR 10+ चा सपोर्ट मिळेल. उत्तम कामकाजासाठी, या हँडसेटमध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite चिप देण्यात आली आहे. हा फोन पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 आणि IP69 चे रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर कार्य करेल. पॉवर बॅकअपसाठी, या डिव्हाइसमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आहे, जी 120W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येते.

iQOO-13-5G
iQOO-13-5G

फोटोग्राफीसाठी, iQOO 13 च्या मागील बाजूस LED फ्लॅश लाइटसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 50MP Sony IMX921 सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP 2X टेलिफोटो लेन्स मिळणार आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. यासह, हँडसेटमध्ये नाइट, पोर्ट्रेट, व्हिडिओ, स्लो मोशन, सुपरमून आणि HD सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सुरक्षिततेसाठी, या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

]]>
Myntra Refund Scam: अरे बापरे! जयपूर गॅंगने केली Myntra ची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक, वाचा डिटेल्स  https://www.digit.in/mr/news/general/myntra-refund-scam-jaipur-gang-cheats-platform-more-than-rs-1-crore-check-details.html https://www.digit.in/mr/news/general/myntra-refund-scam-jaipur-gang-cheats-platform-more-than-rs-1-crore-check-details.html Wed, 11 Dec 2024 09:53:00 +0530

Myntra Refund Scam: प्रसिद्ध आणि लोकप्रिय इ-कॉमर्स फॅशन प्लॅटफॉर्म Myntra बद्दल एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. आपणा सर्वांना माहितीच असेल की, या ठिकाणी ग्राहकांना रंग, फिट किंवा इतर समस्यांवर आधारित प्रोडक्ट्सची एक्सचेंज किंवा रिटर्न करून मिळतात. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, ही रिफंड सर्व्हिस भारतीय ई-कॉमर्स फॅशन प्लॅटफॉर्म Myntra साठी दुःखद ठरली. खरं तर, जयपूरमधील एका टोळीने रिफंडच्या नावाखाली कंपनीची 1.1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, अशी बातमी पुढे आली आहे. पाहुयात डिटेल्स-

Also Read: Realme चे इयरबड्स Myntra वर भारी Discount सह उपलब्ध, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी

'अशा'प्रकारे Myntra ची फसवणूक

आम्ही तुम्हाला सांगतो की, ही फसवणूक या वर्षी मार्च आणि जून महिन्याच्या दरम्यान करण्यात आली आहे, असे अहवालात पुढे आले आहे. या बद्दल इ-कॉमर्स साईट Myntra ला त्यांच्या ऑडिट दरम्यान माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "स्कॅमर्स ब्रँडेड शूज, कपडे आणि हँडबॅग, सौंदर्यप्रसाधने, वॉचेस आणि दागिने यासारख्या इतर वस्तू Myntra ॲप किंवा पोर्टलवरून मोठ्या प्रमाणात ऑर्डर करत होते."

myntra refund scam

त्यांनी पुढे सांगितले की, "त्यानंतर हे लोक पेमेंटची पद्धत म्हणून 'ऑनलाइन' किंवा 'कॅश-ऑन-डिलिव्हरी COD' पर्यायांची निवड करायचे. ऑर्डर मिळाल्यानंतर स्कॅमर्स प्रोडक्ट्सच्या कमतरतेबद्दल प्लॅटफॉर्मवर तक्रारी नोंदवून घेत आणि यानंतर ते 'रिफंड' पर्याय निवडत असत. लक्षात घ्या की, "जर स्कॅमर्सने ब्रँडेड शूजच्या दहा जोड्यांची ऑर्डर दिली तर पार्सल मिळाल्यानंतर, ग्राहक पार्सलमध्ये फक्त पाच पेयर्स आल्याचा दावा करत होते." या पद्धतीने सुद्धा स्कॅमर्स Myntra कडून रिफंड घेत असावेत.

राजस्थानमधील टोळी

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एका टोळीचा या मोठ्या फसवणुकीत सहभाग असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. कारण जवळपास सर्व ऑर्डर जयपूरमधून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर, स्कॅमर्सने ऑर्डर डिलिव्हरीसाठी बेंगळुरू आणि इतर महानगरांचे ऍड्रेस दिले होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, काही ऑर्डर टी स्टॉल, टेलर शॉप किंवा प्रोव्हिजन किंवा स्टेशनरी स्टोअर्स सारख्या व्यावसायिक आस्थापनांना डिलेव्हर करण्यात आली आहेत. या प्रकरणावर पोलीसांचा तपास सुरु आहे.

]]>
Best Smartphones under 45000: अनेक Powerful फीचर्ससह सज्ज आहेत ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन्स, पहा यादी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-smartphones-under-45000rs-including-iqoo-vivo-etc-check-list.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-smartphones-under-45000rs-including-iqoo-vivo-etc-check-list.html Wed, 11 Dec 2024 06:00:00 +0530

Best Smartphones under 45000: जर तुम्ही देखील नवीन आणि प्रीमियम स्मार्टफोन्स खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी पॉवरफुल फीचर्ससह सुसज्ज 45,000 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या फोन्सबद्दल माहिती देणार आहोत. या फोन्समध्ये तुम्हाला कर्व डिस्प्ले, हाय रिफ्रेश रेट, पॉवरफुल प्रोसेसर यासह अनेक खास फिचर्स उपलब्ध आहेत. पहा यादी-

Also Read: लेटेस्ट Moto G35 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

iQOO 11 5G

iQOO 11 5G smartphones under 45000rs
iQOO 5G

iQOO 11 5G मध्ये Amazon वर 44,999 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, 144Hz सह 2K रिझोल्यूशन AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देखील आहे. जो खूप चांगला परफॉर्मन्स देतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा देखील आहे. हा फोन 8K रिझोल्युशन पर्यंत रेकॉर्ड करू शकतो. यात 5000 mAH बॅटरी आहे जी 120W फास्टसह काही मिनिटांत चार्ज होऊ शकते.

Vivo V30 Pro 5G

vivo v30 pro 5g

Vivo V30 Pro 5G हा फोन Amazon वर 41999 रुपयांना उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला 6.78 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले मिळेल. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्हाला Mediatek Dimensity 8200 5G प्रोसेसर मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये तुम्हाला 5000mAH बॅटरी आहे, जी 80W चार्जरने खूप लवकर चार्ज करता येईल. या फोनमध्ये तुम्हाला 3 50MP कॅमेरे मिळतील, ज्यासह उत्तम फोटोग्राफी करता येईल.

Motorola Razr 40

Motorola razr 40 हा फोन तुम्हाला Amazon वर 44999 रुपयांना मिळेल. हा एक फोल्डेबल स्मार्टफोन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिळणार आहे. फोनमधील स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.9 इंच लांबीचा 144Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, यात 4200 mAH बॅटरी आहे, जी 30W च्या चार्जिंग स्पीडला सपोर्ट करेल.

]]>
Realme 14 Pro सिरीजचे भारतीय लाँच कन्फर्म! ‘या’ Powerful फीचर्ससह लवकरच होणार दाखल https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-realme-14-pro-series-india-launch-confirm-check-all-leaks-here.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-realme-14-pro-series-india-launch-confirm-check-all-leaks-here.html Tue, 10 Dec 2024 16:10:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ची आगामी Realme 14 Pro सिरीज लवकरच भारतात लाँच होणार आहे. या सिरीजअंतर्गत कंपनी Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ 5G फोन सादर करणार, अशी अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सिरीज जुलैमध्ये सादर झालेल्या Realme 13 Pro सिरीजची सक्सेसर असेल, असे बोलले जात आहे. या आगामी स्मार्टफोन सिरीजमधेय अनेक पॉवरफुल फीचर्स आहेत, असे देखील सांगितले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme 14 Pro सिरीजचे भारतीय लॉन्चिंग तपशील-

Also Read: लेटेस्ट Moto G35 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

Realme 14 Pro सिरीजचे भारतीय लाँच

Realme India ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या Twitter हँडलद्वारे Realme 14 Pro सिरीज भारतात लाँच केल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे Realme 14 Pro सीरीजला टीज करण्यास सुरुवात केली आहे. त्याबरोबरच, कंपनीने हा फोन पॉवरफुल Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरने सज्ज असेल, याची देखील पुष्टी करण्यात आली आहे.

Realme 14 Pro सिरीजचे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme 14 Pro सिरीजबद्दल अनेक लीक तपशील पुढे आले आहेत. त्यानुसार, कंपनी Realme 14 Pro सीरीज अंतर्गत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ असे दोन फोन सादर करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन्स स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असतील. याव्यतिरिक्त, या सिरीजमध्ये पेरिस्कोप लेन्स देखील मिळेल, असा देखील अंदाज आहे. तर, विशेष म्हणजे Realme 14 Pro मालिकेत AI आधारित इमेज स्टॅबिलायझेशन देखील प्रदान केले जाईल.

Realme 13 Pro सीरीज

कंपनीने या वर्षी जुलैमध्ये Realme 13 Pro सीरीज लाँच केली होती. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्रो प्लस फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP पेरिस्कोप सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे. तर, प्रो फोनमध्ये 50MP प्राथमिक आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 13 Pro फोनची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आणि प्रो प्लस फोनची किंमत 32,999 रुपये इतकी आहे.

]]>
लेटेस्ट Moto G35 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-moto-g35-5g-launched-in-india-check-price-and-specifications.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-moto-g35-5g-launched-in-india-check-price-and-specifications.html Tue, 10 Dec 2024 12:43:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola चा नवीनतम Moto G35 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने अलीकडेच या स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली होती. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट किमतीमध्ये लाँच केला. हा फोन कंपनीने 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे. या फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि 50MP रियर कॅमेरा सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर मग Motorola G35 5G स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात-

Also Read: BSNL Plan: दीर्घकाळ वैधतेसह मिळेल तब्बल 252GB डेटा, जाणून घ्या किंमत आणि बेनिफिट्स

Moto G35 5G ची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Motorola ने नवा Moto G35 5G स्मार्टफोन भारतात दाखल केला आहे. या फोनची किंमत कंपनीने 9,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची विक्री 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होणार आहे.

Moto G35 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G35 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, फोनचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz इतका आहे. याव्यतिरिक्त, हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Unisoc T760 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम बूस्ट करता येईल.

Upcoming Moto G35 5G in India.png
Upcoming-Moto-G35-5G-in-India.png

फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस 50MP क्वाड पिक्सेल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. हा कॅमेरा सेटअप 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. त्याबरोबरच, या फोनच्या मागील बाजूस 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह 50MP मुख्य सेन्सर मिळेल. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, लेटेस्ट 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 20W चार्जिंगच्या समर्थनासह येते.

]]>
BSNL Plan: दीर्घकाळ वैधतेसह मिळेल तब्बल 252GB डेटा, जाणून घ्या किंमत आणि बेनिफिट्स  https://www.digit.in/mr/news/telecom/bsnl-best-plan-of-rs-599-with-long-term-validity-and-3gb-daily-data-check-benifits.html https://www.digit.in/mr/news/telecom/bsnl-best-plan-of-rs-599-with-long-term-validity-and-3gb-daily-data-check-benifits.html Tue, 10 Dec 2024 11:51:00 +0530

भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL कडे अनेक अप्रतिम प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी इतर खाजगी दूरसंचार कंपन्यांपेक्षा कमी किमतीत उत्तम बेनिफिट्ससह प्लॅन्स उपलब्ध करून देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी दीर्घ वैधतेसह कमी किमतीत एक अप्रतिम प्लॅन ऑफर करते. या प्लॅनसह तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात BSNL प्लॅनची किंमत आणि सर्व अप्रतिम बेनिफिट्स-

BSNL Plan

BSNL च्या कथित प्लॅनची किंमत 599 रुपये इतकी आहे. BSNL चा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, हा एक प्रीपेड प्लॅन आहे. जो वर सांगितल्याप्रमाणे, 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना 3GB डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 252GB डेटाचा लाभ मिळेल. त्याबरोबरच, या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. तसेच, यात दररोज 100SMS देखील मिळणार आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, यूजर्स हा प्लॅन BSNL सेल्फकेअर ॲपच्या मदतीने रिचार्ज करू शकतात. लक्षात घ्या की, जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. एकदा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही बीएसएनएल मोबाइल नंबरच्या मदतीने लॉग इन करून हा प्लॅन रिचार्ज करू शकता. तसेच, BSNL च्या अधिकृत वेबसाईट वरून देखील हा प्लॅन खरेदी करता येईल. किंवा रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा!

bsnl long term validity plan

BSNL चा 300 दिवसांच्या वैधतेसह येणारा स्वस्त प्लॅन

BSNL च्या युजर्ससाठी 797 रुपयांचा पॉवर प्लॅन सुद्धा आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना तब्बल 300 दिवसांची वैधता ऑफर करते. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनच्या पहिल्या 60 दिवसांसाठी तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा, दररोज 2GB डेटा आणि 60 दिवसांसाठी प्लॅनमध्ये मोफत SMS ची सुविधाही दिली जाते. त्यानंतर, केवळ इनकमिंग व्हॉईस कॉलिंगची सुविधा 300 दिवस सुरू राहील. हा प्लॅन केवळ सिम ऍक्टिव्ह ते इच्छिणाऱ्या युजर्ससाठी उपयुक्त आहे.

]]>
देशी कंपनीच्या आगामी Lava Blaze Duo ची लाँच डेट Confirm! सामान्य फोनमध्ये मिळतील 2 डिस्प्ले https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-lava-blaze-duo-launch-date-confirm-check-all-details-here.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-lava-blaze-duo-launch-date-confirm-check-all-details-here.html Tue, 10 Dec 2024 10:42:00 +0530

देशी स्मार्टफोन निर्माता Lava एकामागे एक अप्रतिम स्मार्टफोन्स बाजारात सादर करत आहे. कंपनीने अलीकडेच आपला ड्युअल डिस्प्लेसह येणारा पहिला स्मार्टफोन Lava Agni 3 लाँच केला होता. आता कंपनी या विशेषतेसह दुसरा स्मार्टफोनदेखील सादर करणार आहे. दरम्यान, आता कंपनीने आगामी Lava Blaze Duo स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. तसेच, या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील Amazon वर लाईव्ह झाली आहे. या साइटच्या माध्यमातून आगामी फोनची लॉन्चिंग डेट आणि अनेक प्रमुख फीचर्स उघड झाले आहेत. जाणून घेऊयात Lava Blaze Duo चे लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: 10,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 32 इंचचे Smart TV, मोठ्या Discount ऑफर्ससुद्धा उपलब्ध

Lava Blaze Duo ची लाँच डेट

वर सांगितल्याप्रमाणे, भारतीय स्मार्टफोन निर्माता Lava कंपनीने Lava Blaze Duo फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह केली आहे. तसेच, Amazon लिस्टिंगद्वारे फोनच्या लाँच डेटची देखील पुष्टी करण्यात आली आहे. हा फोन भारतात पुढील आठवड्यात म्हणजेच येत्या 16 डिसेंबर 2024 रोजी लाँच केला जाईल. याशिवाय, लावाचा हा स्मार्टफोन सेलेस्टियल ब्लू आणि आर्क्टिक व्हाईट या दोन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

Lava Blaze Duo चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon लिस्टिंगद्वारे या फोनचे डिझाइन आणि अनेक फीचर्स समोर आले आहेत. त्यानुसार, Lava Blaze Duo फोन 6.67 इंच लांबीच्या 3D AMOLED डिस्प्लेसह दाखल होईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. विशेष म्हणजे फोनच्या मागील बाजूस देखील सेकंडरी डिस्प्ले मिळणार आहे. सेकंडरी डिस्प्लेसह तुम्ही नोटिफिकेशन्स, कॉल्स, सेल्फी घेण्यासदेखील सक्षम असाल. हा डिस्प्ले 1.58 इंच लांबीचा असणार आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 7025 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असेल. फोनच्या मागील बाजूस प्रीमियम मॅट फिनिश असेल.

Lava Blaze duo launch date out check details

स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल, या फोनचे स्टोरेज वाढवता येते. तसेच, हा फोन Android 14 वर कार्य करेल. याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये 64MP Sony प्राथमिक कॅमेरा प्रदान केला जाईल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh असेल, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.

]]>
10,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 32 इंचचे Smart TV, मोठ्या Discount ऑफर्ससुद्धा उपलब्ध https://www.digit.in/mr/news/tvs/buy-32-inch-smart-tv-under-rs-10000-from-amazon-winter-special-sale.html https://www.digit.in/mr/news/tvs/buy-32-inch-smart-tv-under-rs-10000-from-amazon-winter-special-sale.html Tue, 10 Dec 2024 09:31:00 +0530

सध्या लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Amazon वर नवीन सेल लाईव्ह आहे. हा Amazon चा विंटर स्पेशल सेल आहे. या सेल अंतर्गत अनेक Smart TV वर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील कमी किमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Amazon ची ही सेल तुमच्यासाठी अप्रतिम संधी आहे. या सेलदरम्यान, तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असाल. तसेच, या उपकरणांवर तुम्हाला बँक कार्डद्वारे स्वतंत्र सवलत, EMI आणि बरेच काही मिळेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही निवडक TV डील्स आणले आहेत. पाहुयात यादी-

Also Read: Best Gaming Smartphones under 20000: कमी किमतीत येत्या जबरदस्त टॉप 5 गेमिंग फोन्स, पहा यादी

Kodak 32 inches Special Edition Series HD Ready Smart LED TV

Kodak चा 32 इंच लांबीची स्पेशल एडिशन सीरीज HD रेडी स्मार्ट LED टीव्ही Amazon वरून केवळ 8,299 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा TV 45% सवलतीसह खरेदी खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची वेगळी सूट देखील मिळेल. तसेच, ऑडिओसाठी यात 30W साउंड आउटपुट आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

smart tv on discount

TCL 32 inches Metallic Bezel-Less HD Ready Smart Android LED TV

TCL चा 32 इंच मेटॅलिक बेझल-लेस HD रेडी स्मार्ट Android LED TV Amazon वरून 8,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा TV 57% सवलतीसह खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची स्वतंत्र सूट मिळेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 16W ऑडिओसाठी सपोर्ट आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

VW 32 inches Frameless Series HD Ready Android Smart LED TV VW32S

VW चा 32 इंच लांबीचा फ्रेमलेस सीरीज HD रेडी Android Smart LED TV Amazon वरून केवळ 7,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करता येईल. यात 56% सवलत मिळणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर बँक कार्डद्वारेही 2000 रुपयांची वेगळी सूट दिली जात आहे. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास, ऑडिओसाठी 20W ध्वनी आउटपुट आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
Best Gaming Smartphones under 20000: कमी किमतीत येत्या जबरदस्त टॉप 5 गेमिंग फोन्स, पहा यादी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-top-5-gaming-smartphones-under-rs-20000-check-here-full-list.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-top-5-gaming-smartphones-under-rs-20000-check-here-full-list.html Tue, 10 Dec 2024 06:00:00 +0530

Best Gaming Smartphones under 20000: तुम्ही सुद्धा 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक उत्तम गेमिंग स्मार्टफोन शोधत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. सध्या भारतीय बाजारात अनेक उत्तम गेमिंग स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 20,000 रुपयांच्या आत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 20,000 रुपयांअंतर्गत गेमिंग स्मार्टफोनसाठी, Motorola, Samsung, iQOO, Nothing आणि Redmi सारखे ब्रँड उत्तम पर्याय सादर करतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांअंतर्गत टॉप 5 गेमिंग फोन्सबद्दल माहिती देणार आहोत.

Also Read: प्रतीक्षा संपली! अखेर Redmi Note 14 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स

Moto Edge 50 Neo

Motorola Edge 50 Neo

Moto Edge 50 Neo स्मार्टफोन प्रसिद्ध इ कॉमर्स साईट Flipkart वर 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, उत्तम परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimension 7300 चिपसेटच्या सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या सेटअपमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 4310mAh बॅटरी आहे, जी 68W टर्बो चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy A15 5G

Samsung Galaxy F15 5G Smartphones

20,000 रुपयांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy A15 5G देखील गेमिंग स्मार्टफोन्समध्ये एक उत्तम पर्याय आहे. या स्मार्टफोनची किंमत Amazon वर 14,998 रुपये इतकी आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी, 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Nothing Phone 2a

Nothing 2a स्मार्टफोन Flipkart वर 23,999 रुपयांना उपलब्ध असेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 7200 Pro चिपसेटद्वारे सुसज्ज आहे. या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. तर, फोटोग्राफीसाठी यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS सह दोन 50MP कॅमेरे मिळतील. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.

iQOO Z9

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा iQOO Z9 फोन Amazon वर 18,498 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 7200 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX882 OIS कॅमेरा समाविष्ट आहे. जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, सुपर नाईट मोड, 2x पोर्ट्रेट झूम आणि व्हिडिओंसाठी 50MP UHD मोडला सपोर्ट करतो. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

Redmi Note 13 Pro 5G

Redmi Note 13 Pro

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर Redmi Note 13 Pro ची किंमत 18,250 रुपये इतकी आहे. Redmi Note 13 Pro फोनमध्ये 1.5K 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी, या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस बसवण्यात आला आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 7s Gen 2 चिपसेटसह येतो. फोटोग्राफीसाठी, यात 200MP प्राइमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर, त्याच्या फ्रंटमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. तर, स्मार्टफोनमध्ये IR ब्लास्टर देखील उपलब्ध आहे.

]]>
प्रतीक्षा संपली! अखेर Redmi Note 14 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-redmi-note-14-series-launched-in-india-check-price-and-specifications.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-redmi-note-14-series-launched-in-india-check-price-and-specifications.html Mon, 09 Dec 2024 14:07:00 +0530

गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi Note 14 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. आज अखेर कंपनीने Redmi Note 14 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Redmi Note 14, Redmi Note 14 Pro, आणि Redmi Note 14 Pro+ असे तीन स्मार्टफोन मॉडेल्स समाविष्ट केले आहेत. यंदा Xiaomi ने मागील पिढीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणांचे आश्वासन दिले आहे. जाणून घेऊयात किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: भारीच की! Vivo V40 Pro 5G वर मिळतोय तब्बल 8000 रुपयांचा Discount, पहा सर्व ऑफर्स

Redmi Note 14 सिरीजची किंमत

Redmi Note 14 5G फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये, 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि या फोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Redmi Note 14 Pro series

Redmi Note 14 Pro 5G फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आणि 8GB+256GB च्या व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, Redmi Note 14 Pro + 5G फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये, 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आणि फोनच्या 12GB+512GB व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Redmi Note 14 5G सिरीजच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 13 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या लाइनअपचे बेस मॉडेल Amazon वरून खरेदी केले जाऊ शकते. तर Pro आणि Pro Plus मॉडेल Flipkart वर उपलब्ध असतील. यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात Discount ऑफर्सदेखील मिळतील.

Redmi Note 14 सिरीजचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 14

Redmi Note 14 मध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, MediaTek Dimensity 7025 Ultra chipset द्वारे समर्थित आहे. सीरिजमधील बेस व्हेरिएंटमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि आणखी 2MP लेन्ससह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 16MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह 5,110mAh बॅटरी मिळेल.

Redmi Note 14 5G launching with super bright screen and triple rear camera

Redmi Note 14 Pro

Redmi Note 14 Pro मध्ये 6.67-इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि Gorilla Victus 2 प्रोटेक्शन आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, मागील बाजूस या फोनमध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP चा प्राथमिक सेन्सर, 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 45W चार्जिंग सपोर्टसह येते.

Redmi Note 14 Pro+

Redmi Note 14 Pro plus with AI support launch confirmed

फ्लॅगशिप Redmi Note 14 Pro+ मध्ये 6.67-इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 90W चार्जिंग सपोर्टसह 6,200mAh बॅटरी आहे.

]]>
भारीच की! Vivo V40 Pro 5G वर मिळतोय तब्बल 8000 रुपयांचा Discount, पहा सर्व ऑफर्स  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-vivo-v40-pro-5g-with-huge-discount-from-flipkart-get-8000rs-off-check-here-html.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-vivo-v40-pro-5g-with-huge-discount-from-flipkart-get-8000rs-off-check-here-html.html Mon, 09 Dec 2024 13:29:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Vivo ने अलीकडेच Vivo V40 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. आम्ही तुमहाला सांगतो की, Vivo V40 Pro 5G हा स्मार्टफोन ऍडव्हान्स फीचर्ससह येणारा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला देखील हा फ्लॅगशिप फोन खरेदी करायचा असेल तर, हीच योग्य वेळ आहे. कारण सध्या इ-कॉमर्स साईट Flipkart वर हा फोन मोठ्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V40 Pro 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-

Also Read: Price Drop! नवा फोन लाँचपूर्वीच Redmi 13 5G च्या किमतीत घसरण, पहा नवीन किंमत

Vivo V40

Vivo V40 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

नवा फ्लॅगशिप फोन Vivo V40 Pro 5G फोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 60,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन सध्या 5000 रुपयांच्या सवलतीसह 55,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची वेगळी सूट दिली जाणार आहे. अशाप्रकारे तुम्हाला हा फोन तब्बल 8000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Vivo V40 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V40 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Mediatek Dimensity 9200+ प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. यासोबतच, या फोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. विशेषतः ता फिचरद्वारे तुम्ही तुमच्या फोटोमधून अनोळखी आणि नको त्या वस्तू हटवण्यास सक्षम असाल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40 Pro 5G फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम आणि 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्स दिले गेले आहेत. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.

Vivo V40 pro 5g
Vivo V40 pro 5g

याव्यतिरिक्त, या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा ZEISS OIS सपोर्टसह उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 50MP सेकंडरी आणि 50MP तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या सेन्सरमध्ये हाय रिझोल्युशन, लाइव्ह फोटो, नाईट, पोर्ट्रेट, फोटो, व्हिडिओ, मायक्रो मूव्ही, ड्युअल व्ह्यू सपोर्ट आहे. तर, फोनच्या मागील बाजूस स्मार्ट ऑरा लाईट देखील दिली गेली आहे. वॉटर प्रोटेक्शनसाठी या फोनला IP68 रेटिंग आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
Price Drop! नवा फोन लाँचपूर्वीच Redmi 13 5G च्या किमतीत घसरण, पहा नवीन किंमत  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-redmi-13-5g-with-discount-from-flipkart-check-here-all-offers.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-redmi-13-5g-with-discount-from-flipkart-check-here-all-offers.html Mon, 09 Dec 2024 12:39:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi चा सब-ब्रँड Redmi ने आपली Note 14 सिरीज भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. मात्र, यापूर्वीच कंपनीने त्याच्या मागील मॉडेल Redmi 13 5G च्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण केली आहे. या फोनवर फ्लॅट डिस्काउंटसह बँक ऑफर आणि EMI ऑफर केली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन आणि स्वस्त 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Redmi 13 5G ची किंमत-

Also Read: OnePlus Community Sale: फ्लॅगशिप किलरच्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर Discount, पहा यादी

Redmi 13 5G
Redmi 13 5G

Redmi 13 5G ची किंमत आणि ऑफर

Redmi 13 5G फोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. तर,
या फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,499 रुपयांना लाँच करण्यात आला होता. सध्या Redmi 13 5G स्मार्टफोनवर Flipakrt वर 2,200 पेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट आणि 1,500 पर्यंतची बँक ऑफर दिली जात आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही मॉडेल्सवर Axis, HDFC, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड, IDFC आणि इतर काही बँकांकडून 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. हा फोन हवाईयन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि स्टायलिश ऑर्किड पिंक कलर ऑप्शन्समध्ये येतो. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Redmi 13 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi 13 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंच लांबीचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हे Widevine L1 ला देखील समर्थन देते. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट मिळेल. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर, Redmi 13 5G Android 14 वर आधारित Xiaomi HyperOS वर कार्य करेल. सुरक्षिततेसाठी, या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Redmi-13-5G-features

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,030mAh बॅटरी आहे. त्याबरोबरच, हा फोन 33W चार्जरसह येतो. फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5G सिम सपोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक,आणि USB Type-C पोर्ट यासारखी अनेक फीचर्स असतील.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
OnePlus Community Sale: फ्लॅगशिप किलरच्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर Discount, पहा यादी  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/oneplus-community-sale-live-on-amazon-india-check-best-deals-on-smartphones.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/oneplus-community-sale-live-on-amazon-india-check-best-deals-on-smartphones.html Mon, 09 Dec 2024 12:03:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या इ- कॉमर्स साईट Amazon India वर OnePlus Community Sale लाईव्ह आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन ब्रँडची लोकप्रिय उपकरणे उपलब्ध आहेत. कंपनीच्या अधिकतर स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स उपलब्ध करून दिले गेले आहेत. येथे आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या निवडक फोनबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Also Read: Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार प्रसिद्ध स्मार्टफोन्स, Redmi, Vivo फोन्स समाविष्ट

OnePlus Nord CE4 Lite 5G

OnePlus Nord CE 4 Lite 5G
#OnePlus Nord CE 4 Lite 5G

OnePlus Nord CE4 Lite ची किंमत 17,999 रुपये इतकी सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, 873 रुपयांचा EMI मोबाईल फोनवर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंजसाठी असेल तर, या डिव्हाइसवर 16,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. मात्र, चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती उत्तम असावी. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

OnePlus Nord 4 5G

OnePlus Nord 4 5G Price Cut

OnePlus Nord 4 5G फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेकडून 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच. सहज खरेदी करण्यासाठी, या हँडसेटवर 1,357 रुपयांचा EMI पर्याय मिळेल. एवढेच नाही तर, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंजसाठी असेल तर, यावर 26,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर आणि AI वैशिष्ट्ये आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

OnePlus 12R

OnePlus 12R स्मार्टफोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 38,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 1,891 रुपयांचा EMI दिला जात आहे. तसेच, या फोनवर ICICI बँकेकडून 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि 16GB पर्यंत रॅम आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि मजबूत 5500mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार प्रसिद्ध स्मार्टफोन्स, Redmi, Vivo फोन्स समाविष्ट  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-smartphones-this-week-in-india-including-redmi-vivo-etc-check-full-list.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-smartphones-this-week-in-india-including-redmi-vivo-etc-check-full-list.html Mon, 09 Dec 2024 10:42:00 +0530

Upcoming Smartphones This Week: नव्या वर्षाला आता सुरुवात होणार असून डिसेंबरचा दुसरा आठवडा देखील सुरु झाला आहे. पहिल्या आठवड्यात अनेक स्मार्टफोन्स भारतात दाखल झाले असून, दुसरा आठवडा देखील स्मार्टफोन लाँचच्या नावावर असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या आठवड्यात 3 स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहेत. यामध्ये Xiaomi, Vivo आणि Motorola चा समावेश आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात लवकरच भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-

Also Read: लक्ष द्या! सुप्रसिद्ध CMF Phone 1 च्या स्फोटामुळे महाराष्ट्रात दुचाकीचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Redmi Note 14 सिरीज

आगामी Redmi Note 14 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा सध्या सुरु आहे. या फोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी देखील झाली आहे. ही सिरीज आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ फोन लाँच करण्याची अपेक्षा आहे. प्रो प्लस हा फोन सीरीजचा प्रीमियम फोन असणार आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्यावरच फोनची किंमत आणि सर्व योग्य तपशील पुढे येतील.

Moto G35

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने Moto G35 फोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. भारतात हा स्मार्टफोन 10 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन भारतापूर्वीच जागतिक बाजारपेठेत धडकला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Unisoc T760 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Vivo X200 सिरीज

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या आगामी Vivo X200 सीरीजच्या भारतीय लाँचची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. हा स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात येत्या 12 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये कंपनी Vivo X200 आणि Vivo X200 Pro फोन सादर करण्याची अपेक्षा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ही भारतातील पहिली सिरीज असेल, ज्यामध्ये 200MP ZEISS APO टेलिफोटो कॅमेरा असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी असेल.

]]>
लक्ष द्या! सुप्रसिद्ध CMF Phone 1 च्या स्फोटामुळे महाराष्ट्रात दुचाकीचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू https://www.digit.in/mr/news/mobile-phones/two-wheeler-accident-in-maharashtra-due-to-explosion-of-famous-cmf-phone-1-check-all-details.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/two-wheeler-accident-in-maharashtra-due-to-explosion-of-famous-cmf-phone-1-check-all-details.html Mon, 09 Dec 2024 09:53:00 +0530

CMF Phone 1 Blast: अलीकडेच झालेल्या एका प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताच्या मोबाईल फोन स्फोटाच्या अपघातामुळे एकाच्या मृत्यू झाल्याची चिंताजनक बातमी पुढे आली आहे. सविस्तर सांगायचे झाल्यास, शनिवारी रात्री एका 55 वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून जात असताना खिशातील मोबाईलचा स्फोट झाल्याने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश संग्रामे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना महाराष्ट्रातील अर्जुनी मोरगाव मार्गावर सानगडीजवळ, भंडारा जिल्ह्यात घडली आहे.

Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Motorola edge 50 Fusion स्वस्तात खरेदीची संधी, पहा ऑफर

आम्ही तुम्हाला सांगतो की, संग्रामे यांच्या खिशात केवळ एक महिन्यापूर्वी नव्याने घेतलेला CMF Phone 1 होता, ते 56 वर्षीय नथू गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना या फोनचा स्फोट झाला आहे. हे दोघे एका कौटुंबिक मेळाव्यासाठी जात असताना फोनचा स्फोट झाला आहे. सोबती गायकवाड हे दुचाकीवरून पडले आणि त्यांना अनेक दुखापती झाल्या असून त्यांच्या सध्या उपचार सुरू आहेत. तर, या स्फोटात संग्रामे गंभीर भाजले, ज्यामुळे आग लागली. त्यानंतर, उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असताना त्यांचा मृत्यू झाला.

nothing phone 1 blast in maharashtra

फोन ब्लास्टचे कारण काय?

सध्या तरी फोनच्या स्फोटामागील नेमके कारण पुढे आलेले नाही, परंतु एका अहवालानुसार स्फोट मोबाईल फोनची बॅटरी जास्त तापल्यामुळे झाला, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचा पोलिस अजूनही प्रयत्न करत आहेत. या घटनेबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्या व्यक्तीचा फोन फक्त अवघा एक महिना जुना होता. अशा परिस्थितीत CMF च्या फोनची कॉलिटी आणि सिक्योरिटीवर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

फोन ओवरहीटिंग होण्यापासून कसे थांबवायचे?

CMF Phone 1 हा कंपनीचा पहिला वाहिला स्मार्टफोन आहे, जो अवघ्या काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मोबाईल फोन तज्ञांच्या मते असे फोन स्फोट खूपच दुर्मिळ आहेत. हे स्फोट सहसा बॅटरी संबंधित समस्यांमुळे असतात. जास्त चार्जिंग, अनधिकृत चार्जर वापरणे किंवा फोनला जास्त उष्णतेच्या संपर्कात आणणे यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.

CMF Phone 1 Blast

त्याबरोबरच, फोन जबाबदारीने चार्ज करणे आणि फोन रात्रभर चार्ज करणे टाळा. फोन थेट सूर्यप्रकाशाचा संपर्कात येऊ देऊ नका. फोनमध्ये सेकंड हँड बॅटरी वापरू नका. कुठल्याही दुकानांमधून तुमचा फोन दुरुस्त करून घेऊ नका, शक्य असल्यास अधिकृत स्टोअरमध्ये जा.

]]>
50MP कॅमेरासह येणाऱ्या Motorola edge 50 Fusion स्वस्तात खरेदीची संधी, पहा ऑफर https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-motorola-edge-50-fusion-with-discount-from-flipkart-check-offers.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-motorola-edge-50-fusion-with-discount-from-flipkart-check-offers.html Sun, 08 Dec 2024 16:42:00 +0530

प्रसिध्द स्मार्टफोन निर्माता Motorola ने अलीकडेच Motorola edge 50 Fusion स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने मिड रेंज मध्ये सादर केला गेला आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन आता प्रसिध्द इ-कॉमर्स साईट Flipkart वर मोठ्या सवलातींसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्हाला यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Motorola edge 50 Fusion ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: फक्त 15,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 43 इंच Smart TV, अप्रतिम ऑफर्ससह Amazon वर उपलब्ध

motorola edge 50 fusion in flipkart

Motorola Edge 50 Fusion किंमत आणि ऑफर्स

Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये आहे. या फोनचा टॉप व्हेरिएंट 24,999 रुपयांना येतो. हा स्मार्टफोन Motorola च्या अधिकृत वेबसाइट किंवा Flipkart वरून खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, IDFC आणि ॲक्सिस बँक कार्डवर 2000-2000 रुपयांची थेट सूट मिळेल. तसेच, HDFC कार्डवर 2250 रुपयांची सूट आहे.

हा फोन सहज EMI वर देखील खरेदी करता येईल. तसेच, फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. हा फोन फॉरेस्ट ब्लू, फॉरेस्ट ग्रीन, हॉट पिंक आणि मार्शमॅलो ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये येईल. येथून खरेदी करा

Motorola Edge 50 Fusion

Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश दर 144Hz इतका आहे. हा मोटोरोला हँडसेट कॉर्निंग ग्लास 5 प्रोटेक्शन एसजीएस लो ब्लू लाइट आणि एसजीएस लो मोशन ब्लरसह येतो. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये Octa-core 4nm Qualcomm SM7435-AB Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

motorola edge 50 fusion  in flipkart

याव्यतिरिक्त, Motorola Edge 50 Fusion च्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. मागील बाजूस LED फ्लॅश, HDR सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

दरम्यान, फ्रंट कॅमेरा 4K मध्ये 30fps आणि 30fps वर 1080p रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतो. ड्युअल कॅप्चर, स्पॉट कलर, पोर्ट्रेट, लाइव्ह फिल्टर, ग्रुप सेल्फी, प्रो मोड आणि ऑटो स्माईल कॅप्चर यासारखे अनेक कॅमेरा फीचर्स फोनमध्ये देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी, हा मोटोरोला स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो, जो TurboPower 68W चार्जिंगला सपोर्ट करतो.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
फक्त 15,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 43 इंच Smart TV, अप्रतिम ऑफर्ससह Amazon वर उपलब्ध  https://www.digit.in/mr/news/tvs/43-inch-smart-tv-under-15000-rs-with-discount-from-amazon-check-list.html https://www.digit.in/mr/news/tvs/43-inch-smart-tv-under-15000-rs-with-discount-from-amazon-check-list.html Sat, 07 Dec 2024 06:00:00 +0530

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या मोठ्या आणि अप्रतिम Smart TV वर बंपर Discount मिळत आहे. जर तुम्हाला देखील नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. लक्षात घ्या की, कमी किमतीत तुम्हाला 43 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात 43 इंच Smart TV वरील उत्तम ऑफर्स-

Also Read: लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

SKYWALL Full HD LED Smart TV

SKYWALL चा हा TV अर्थातच 43 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो. या टीव्हीची किंमत 14,799 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्ट टीव्ही 717 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल. यात इनबिल्ट Chromecast उपलब्ध आहे. याद्वारे टीव्हीवर Netflix, Youtube आणि Prime Video सारखे ॲप्स वापरता येतील. खरेदी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा!

Best LED Smart TV deals under Rs 15000 on Amazon

Foxsky Full HD Smart LED TV

Foxsky चा हा स्मार्ट TV प्रसिद्ध Amazon India वर त्याची किंमत 13,499 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर बँक ऑफर्स, EMI इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंच लांबीचा LED डिस्प्ले आहे. तसेच, या TV मध्ये तुम्हाला Netflix, Prime Video, Zee5, Eros Now, JioCinema आणि SonyLiv सारख्या OTT ऍप्स मिळतील. यामध्ये Wi-Fi आणि गुगल असिस्टंट सारखे नवीनतम फीचर्स उपलब्ध आहेत. खरेदी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा!

VW Frameless Series Full HD Android Smart LED TV

VW स्मार्ट टीव्हीमध्ये मिराकास्ट फिचर आहे, जे तुम्हाला तुमचा फोन टीव्हीशी कनेक्ट करू देते. या टीव्हीची किंमत 14,499 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Axis Bank क्रेडिट कार्डसह EMI पर्याय निवडल्यास 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि Zee5 सारख्या ॲप्सचा वापर करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट, ब्लू रे प्लेयर, 2 USB पोर्ट आणि ऑप्टिकल आउटपुट आहे. खरेदी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-tecno-phantom-v-fold-2-and-v-flip-2-launched-in-india-check-price.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-tecno-phantom-v-fold-2-and-v-flip-2-launched-in-india-check-price.html Fri, 06 Dec 2024 16:22:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno चे नवीनतम फोल्डेबल स्मार्टफोन्स अखेर भारतात दाखल झाले आहेत. होय, लेटेस्ट Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने नुकताच या सिरीजचा टीझर रिलीज केला होता. त्यानंतर, आता हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत. या दोन्ही फोन्सची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon द्वारे केली जाईल. चला तर मग जाणून घेऊयात Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Realme GT 6T 5G वर 5000 रुपयांच्या Discount, पहा Best ऑफर

Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची किंमत

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno Phantom V Flip 2 ची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या PHANTOM V Fold 2 स्मार्टफोन 79,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, दोन्ही स्मार्टफोनची ही विशेष लाँच प्राईस आहे. या किमतीत हा स्मार्टफोन केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 13 डिसेंबर 2024 पासून Amazon India वर सुरू होईल. फ्लिप स्मार्टफोन कार्स्ट ग्रीन आणि रिपलिंग ब्लू कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे फोल्ड स्मार्टफोन मूनडस्ट ग्रे आणि ट्रॅव्हर्टाइन ग्रीन कलर पर्यायांमध्ये सादर केला गेला आहे.

Tecno Phantom V Fold 2

Tecno Phantom V Fold 2 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.85-इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.42 इंच लांबीचा अंतर्गत LTPO AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Octa Core MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 512GB इंटरनल स्टोरेज आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 2x ऑप्टिकल झूम आणि 20x डिजिटल झूमसह 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये फ्रंट ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 32MP मुख्य आणि 32MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, यात 5750mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W वायरलेस आणि 70W अल्ट्रा चार्जिंगला समर्थन देईल.

Tecno Phantom V Flip 2

Tecno Phantom V Flip 2 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंच लांबीचा मुख्य LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3.64 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे यात कव्हर स्क्रीन कस्टमाइज करण्याचा पर्याय देखील आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 8020 6nm प्रोसेसर उपलब्ध आहे. यात डॉल्बी ATMOS सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स देण्यात आले आहेत.

 Tecno Phantom V Flip 2

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 32MP कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फ्लिप स्मार्टफोनमध्ये 4720mAh बॅटरी आहे, जी 70W अल्ट्रा चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.3 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

]]>
Vodafone Idea युजर्सना झटका! आपल्या बेस्ट सेलिंग प्लॅन्सची वैधता केली कमी, जाणून घ्या किंमत  https://www.digit.in/mr/news/telecom/vodafone-idea-reduces-best-selling-plan-validity-check-here-price-and-benifits.html https://www.digit.in/mr/news/telecom/vodafone-idea-reduces-best-selling-plan-validity-check-here-price-and-benifits.html Fri, 06 Dec 2024 13:21:00 +0530

भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी Vodafone Idea ने त्यांच्या एका प्रीपेड प्लॅनची ​​वैधता कमी केली आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या प्लॅन्सच्या किमतीत दरवाढ केल्यामुळे ग्राहकांची नाराजी ओढवली आहे. दरम्यान, ग्राहकांना आणखी एक झटका देत कंपनीने आपल्या बेस्ट सेलिंग प्लॅनची वैधता कमी केली आहे. होय, यंदा VI कंपनीने प्लॅनची किंमत वाढवण्याऐवजी त्याची वैधता कमी केली आहे. म्हणजेच आता कंपनीने या प्लानची वैधता कमी करून युजर्ससाठी प्लान महाग केला आहे. जाणून घेऊयात या प्लॅन्सची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

Vodafone Idea ने 'या' प्लॅनची वैधता केली कमी

आम्ही तुम्हाला सांगतो की, Vodafone Idea च्या 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता कमी करण्यात आली आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, तुम्हाला या प्लॅन्ससह दररोज 100 मोफत SMS मिळतात. एवढेच नाही तर, डेटा वापरासाठी देखील तुम्हाला यात 4GB मोबाइल डेटा मिळणार आहे.

Vodafone Idea New Recharge Plans
Vodafone Idea

वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची वैधता 48 दिवसांची होती. मात्र, आता कंपनीने हा प्लॅन बदलला आहे. या प्लॅनची ​​वैधता केवळ 40 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच, कंपनीने या प्लॅनची ​​वैधता केवळ 8 दिवसांनी कमी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, वैधता कमी केल्यामुळे या प्लॅनची ​​किंमत सुमारे 40 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आधीपेक्षा हा प्लॅन युजर्ससाठी चांगलाच महागला आहे. रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

या प्लॅनच्या वैधतेत देखील कपात

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vodafone Idea ने अलीकडेच आणखी एका प्लॅनची ​​वैधता कमी केली आहे. कथित VI प्लॅनची किंमत 479 रुपये इतकी आहे. पूर्वी हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो, आता कंपनीने त्याची वैधता केवळ 48 दिवस इतकी केली आहे. एवढेच नाही तर, कंपनीने या प्लॅनमधील डेटा लाभ सुद्धा कमी केला आहे. पूर्वी या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळत होता. आता या प्लॅनमध्ये दररोज केवळ 1GB डेटा मिळेल. तसेच, यात अमर्यादित किलिंग आणि SMS बेनिफिट्स देखील आहेत.

]]>
Instagram Down: लॉग-इन, फीड रिफ्रेश करताना आणि मॅसेजेस पाठवताना येतायेत अडचणी, वाचा सविस्तर  https://www.digit.in/mr/news/apps/instagram-down-most-of-the-users-facing-problems-in-login-and-sending-messages-etc.html https://www.digit.in/mr/news/apps/instagram-down-most-of-the-users-facing-problems-in-login-and-sending-messages-etc.html Fri, 06 Dec 2024 11:58:00 +0530

Instagram Down: हजारो वापरकर्ते मेटाचे फोटो शेअरिंग ॲप्लिकेशन Instagram वापरण्यास सक्षम नाहीत. जगभरातील Instagram वापरकर्ते त्यांच्या फीड्स रीफ्रेश करण्यात किंवा मॅसेज पाठवताना येणाऱ्या व्यत्ययाबद्दल तक्रारी करत आहेत. रिअल-टाइम आउटेज-डिटेक्टिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरनुसार, शुक्रवारी पहाटे सकाळी 7 वाजतापासून समस्या सुरू झाल्या.

instagram down

या समस्येबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, दर 30 मिनिटांनी 150 हून अधिक सातत्यपूर्ण अहवालांसह आलेख जवळजवळ चार तास लाल झाला आहे. एवढेच नाही तर, यूएस आणि इतर देशांतील इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनाही अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्लॅटफॉर्मनुसार, 77% हून अधिक वापरकर्त्यांना ॲप्लिकेशनमध्ये, 22% युजर्सना लॉगिनमध्ये आणि 11% युजर्सना त्यांचे कंटेंट अपलोड करताना समस्या येत आहेत.

X वर तक्रारी आणि मिम्स वायरल

आम्ही तुम्हाला सांगतो की, नेहमीप्रमाणेच, X प्लॅटफॉर्मवर युजर्स तक्रारी करत आहेत, तर काही लोक याबद्दल मिम्स सादर करत आहेत. वापरकर्ते X वर या आउटेजसाठी फेसबुक, मेटा, इंस्टाग्राम आणि CEO मार्क झुकरबर्ग यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, मेटाने यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इंस्टाग्राम डाउनचे कारण संभवतः तांत्रिक त्रुटी किंवा बग आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे फीड रीफ्रेश करताना किंवा मॅसेजेस पाठवताना व्यत्यय येईल. तसेच, X वरील काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांनी समस्येचे निराकरण करण्यासाठी ऍप अनइंस्टॉल आणि रिइन्स्टॉल केले, यानंतर त्यांचे ऍप उत्तमरीत्या कार्य करत होते.

]]>
32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Realme GT 6T 5G वर 5000 रुपयांच्या Discount, पहा Best ऑफर  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-realme-gt-6t-5g-with-discount-from-amazon-get-5000rs-off-check-all-offers.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-realme-gt-6t-5g-with-discount-from-amazon-get-5000rs-off-check-all-offers.html Fri, 06 Dec 2024 11:13:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. जर तुम्हाला देखील नवा Realme स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खास पर्याय आहे. होय, पॉप्युलर Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर सध्या मोठ्या प्रमाणत डिस्काउंट मिळत आहे. हा डिस्काउंट तुम्हाला प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme GT 6T 5G स्मार्टफोनची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-

Also Read: आगामी Redmi Note 14 5G फोन Amazon वर सूचीबद्ध! मिळतील Powerful फीचर्स, पहा आकर्षक डिझाईन

relame gt 6t

Realme GT 6T 5G ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध Realme GT 6T 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन Amazon वरअतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची सूट मिळेल. अशाप्रकारे तुम्ही हा फोन केवळ 27,999 रुपयांना खरेदी करण्यासाठी सक्षम आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Realme GT 6T 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme GT 6T 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 6000 Nits पर्यंत कमाल ब्राइटनेस मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Realme GT 6T 5G फोन Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Realme GT 6T 5G फोनमध्ये, तुम्हाला 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB असे चार व्हेरिएंट मिळतील. तसेच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Realme GT 6T
# Realme GT 6T

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Realme GT 6T 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो. यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील समाविष्ट आहे. सेल्फीच्या शौकिंग लोकांसाठी हा फोन सर्वोत्तम आहे. कारण यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोटो, पोर्ट्रेट, नाईट सीन्स, पॅनोरमा, व्हिडिओ, मल्टी-सीन व्हिडिओ, टाइम-लॅप्स फोटोग्राफी मोड या सेन्सरमध्ये उपलब्ध आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
आगामी Redmi Note 14 5G फोन Amazon वर सूचीबद्ध! मिळतील Powerful फीचर्स, पहा आकर्षक डिझाईन  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-redmi-note-14-5g-phone-listed-on-amazon-check-here-details.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-redmi-note-14-5g-phone-listed-on-amazon-check-here-details.html Fri, 06 Dec 2024 09:51:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने आगामी Redmi Note 14 सिरीजची लाँच डेट आधीच जाहीर केली आहे. ही सिरीज भारतात येत्या 9 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी Redmi Note 14 5G, Redmi Note 14 Pro 5G आणि Redmi Note 14 Pro+ 5G हे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. कंपनीने लाँचपूर्वीच Redmi Note 14 Pro+ 5G फोनच्या उपलब्धतेची पुष्टी केली आहे. या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह झाली आहे. याद्वारे फोनचे लुक आणि महत्त्वाचे तपशील देखील पुढे आले आहेत.

Also Read: आगामी Moto G35 च्या लाँचपूर्वीच किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवा फोन?

Redmi Note 14 5G

आगामी Redmi Note 14 5G स्मार्टफोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह झाली आहे. Amazon लिस्टिंगनुसार हा फोन भारतात 9 डिसेंबरला लॉन्च होईल. कंपनीने आधीच Redmi Note 14 सीरीजच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. या लिस्टिंगद्वारे, फोनच्या लाँचपूर्वीच डिझाइन आणि अनेक प्रमुख फीचर्स उघड झाली आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi Note 14 5G देखील या Redmi Note 14 सिरीजचा भाग असेल.

Redmi Note 14 5G चे कन्फर्म फीचर्स

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon लिस्टिंगद्वारे या फोनचे डिझाइन आणि फीचर्स समोर आले आहेत. त्यावरून आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनला बॅक कर्व बॉडी आणि स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे. फोनमध्ये सुपर ब्राइट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्क्वेअर कॅमेरा मॉड्युलमध्ये तीन रिंग दिसू शकतात, ज्यामध्ये वेगवेगळे सेन्सर्स असतील. यासोबतच मॉड्यूलमध्ये LED फ्लॅश देण्यात येणार आहे. Amazon सूचीद्वारे, फोन ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये मिळेल, असे देखील पुढे आले आहे.

redmi note 14 5g

त्याबरोबरच, या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक कॅमेरा असेल, याची देखील पुष्टी लिस्टींगद्वारे झाली आहे. एवढेच नाही तर, या फोनमध्ये अनेक AI कॅमेरा फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे कंपनी AiMi सह या फोनमध्ये AI फीचर्स मिळवू शकतात. फोनच्या डिस्प्लेमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग सेन्सर्ससाठी पंच-होल कटआउट देखील उपलब्ध असेल.

]]>
Best BT Calling Smartwatches: अगदी कमी किमतीत मिळवा उत्तम स्मार्टवॉचेस, किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी  https://www.digit.in/mr/news/wearable-devices/best-bt-calling-smartwatches-under-rs-1000-including-boat-noise-etc-check-list.html https://www.digit.in/mr/news/wearable-devices/best-bt-calling-smartwatches-under-rs-1000-including-boat-noise-etc-check-list.html Fri, 06 Dec 2024 06:00:00 +0530

Best BT Calling Smartwatches: सध्या कमी किमतीत अनेक स्मार्टवॉचेस भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. boAt, Noise, इ. अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे स्मार्टवॉचेस भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही देखील कमी किमतीत नवीन स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. Amazon वर 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक स्मार्टवॉचेस उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि बेस्ट ऑप्शन्स आणले आहेत. पहा यादी-

Also Read: iQOO 13 Pre-Booking: नुकतेच लाँच झालेल्या फ्लॅगशिप फोनची प्री-बुकिंग सुरु, पहा Best ऑफर्स

Noise Vivid Call 2

Noise Vivid Call 2 स्मार्टवॉच Amazon वर 999 रुपयांना 83% सवलतीसह खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. त्याबरोबरच, या डिवाइसवर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स देखील आहेत. तसेच, ही वॉच एका चार्जवर 7 दिवसांपर्यंत चालेल. यात ब्लूटूथ कॉलिंगसारखे ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा मिळतील. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

boAt Xtend Call Plus

boAt Xtend Call Plus स्मार्टवॉच Amazon वरून 999 रुपयांना 88% सूट देऊन खरेदी करता येईल. या वॉचमध्ये सुद्धा तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगसाठी सपोर्ट मिळेल. तसेच, यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यात SpO2 सारखे सेन्सर देखील आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला हिंदी भाषेचा सपोर्ट मिळतो. यावर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

pTron Reflect Pro

best smartwatches under rs 1000

pTron Reflect Pro स्मार्टवॉचची किंमत Amazon वर 849 रुपयांना 78% डिस्काउंटसह खरेदी करता येईल. विशेष म्हणजे ही स्मार्टवॉच दिसायला अगदी Apple वॉचसारखी आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचे सपोर्ट मिळणार आहे. पाण्याच्या संरक्षणासाठी याला IP68 रेटिंग देण्यात मिळाले आहे. ही वॉच बँक ऑफर्स, EMI इ. सह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहे.

]]>
आगामी Moto G35 च्या लाँचपूर्वीच किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवा फोन?  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-moto-g35-5g-launch-to-be-soon-in-india-price-leak-check-here.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-moto-g35-5g-launch-to-be-soon-in-india-price-leak-check-here.html Thu, 05 Dec 2024 17:08:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने नुकतेच आपल्या आगामी स्मार्टफोन Moto G35 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, कंपनीने या फोनची लाँच डेट देखील जाहीर केली आहे. जर तुम्हाला स्वस्त 5G फोन घ्यायचा असेल, तर मोटोरोलाचा नवीन मोबाईल Moto G35 पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. हा एक बजेट रेंज स्मार्टफोन असेल, जो स्टायलिश लुक, उत्कृष्ट फीचर्स आणि पॉवरफुल स्पेसिफिकेशन्ससह येईल. जाणून घेऊयात आगामी Moto G35 5G चे तपशील-

Also Read: OnePlus 13 Launch: अनेक AI फीचर्ससह फोन लवकरच भारतात होणार लाँच, Amazon वर सूचिबद्ध

Moto G35 5G with 4k video recording camera launching

Moto G35 5G ची लाँच डेट आणि अपेक्षित किंमत

आगामी Moto G35 5G फोन भारतीय बाजारात 10 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. होय, कंपनी 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या अधिकृत X द्वारे या फोनची किंमत आणि विक्रीची तारीख जाहीर करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Moto G35 5G च्या लाँचची घोषणा प्रसिद्ध शॉपिंग साईट Flipkart वर आहे.

Moto G35 5G फोनची अपेक्षित किंमत भारतात 4GB रॅम सह 128GB स्टोरेजसह लाँच केला जाईल. हा फोन 15 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये आणला जाऊ शकतो. तसेच, फोनचे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील पुढे आले आहेत. भारतात हा फोन लीफ ग्रीन, गावा रेड आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

Moto G35 5G चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मिळालेल्या माहितीनुसार, Moto G35 5G फोन गोल-एज फ्लॅट पंच-होल डिस्प्लेवर तयार केला आहे. या फोनमध्ये 6.72-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन LTPS LCD पॅनेलवर बनवली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unisoc T760 ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.

Upcoming-Moto-G35-5G-in-India.png

फोटोग्राफीसाठी, LED फ्लॅशसह यात 50MP चा मुख्य सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये मजबूत 5000 mAh बॅटरी मिळेल, जी 20W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. मात्र, या फोनची खरी किंमत आणि कन्फर्म स्पेसिफिकेशन्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

]]>
iQOO 13 Pre-Booking: नुकतेच लाँच झालेल्या फ्लॅगशिप फोनची प्री-बुकिंग सुरु, पहा Best ऑफर्स  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-iqoo-13-pre-booking-starts-in-india-check-all-best-offers-here.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/latest-iqoo-13-pre-booking-starts-in-india-check-all-best-offers-here.html Thu, 05 Dec 2024 13:46:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने बहुप्रतिक्षीत iQOO 13 स्मार्टफोन अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला आहे. या नवीनतम iQOO 13 फोनची प्री-बुकिंग भारतीय बाजारात सुरु झाली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Elite चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात ऑफर्स-

Also Read: Price Cut! 6000mAh बॅटरीसह येणाऱ्या लोकप्रिय Vivo स्मार्टफोनच्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत

iQOO 13 ची किंमत

iQOO ने 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह दोन प्रकारांमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनच्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 16GB+512GB व्हेरिएंटची किमत 59,999 रुपये इतकी आहे. ग्राहक आज 5 डिसेंबरपासून Amazon India आणि iQOO इंडिया ई-स्टोअरवर 999 रुपये भरून फ्लॅगशिप स्मार्टफोनची प्री-बुकिंग करू शकतात.

लक्षात घ्या की, प्री-बुक केलेले ग्राहक प्री-बुकिंग ऑफरचा लाभ घेण्यासाठी 10 डिसेंबर रोजी शिल्लक रक्कम भरू शकतात. प्री-बुकिंग ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 12 महिन्यांची विस्तारित वॉरंटी, 2,000 रुपयांचे iQOO TWS 1e मोफत, HDFC बँक आणि ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी 3,000 रुपयांची झटपट सूट, iQOO किंवा Vivo स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त 2,000 रुपयांचे लॉयल्टी एक्सचेंज बोनस आणि नऊ महिन्यांपर्यंतचा नो कॉस्ट EMI मिळतील.

iQOO-13-5G
iQOO-13-5G

iQOO 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता लेटेस्ट iQOO 13 मध्ये 6.82 इंच लांबीचा LTPO AMOLED Q10 डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये विशेषतः कॅमेरा मॉड्यूलच्या आसपास एक हॅलो लाइटिंग देखील आहे, जे कॉल आणि मॅसेज नोटिफिकेशन्स देतो. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य Sony IMX921 कॅमेरा, 50MP Samsung अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50MP Sony IMX816 टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा असेल. पॉवर बॅकअपसाठी, 120W चार्जरसह 6000mAh बॅटरी आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

]]>
Price Cut! 6000mAh बॅटरीसह येणाऱ्या लोकप्रिय Vivo स्मार्टफोनच्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/vivo-y58-5g-price-cut-in-india-check-new-price-and-offers-here.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/vivo-y58-5g-price-cut-in-india-check-new-price-and-offers-here.html Thu, 05 Dec 2024 12:47:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. जर तुम्ही देखील Vivo चा नवीनतम 5G स्मार्टफोन बजेटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Vivo ने आपल्या Y-सीरीजचा प्रसिद्ध फोन Vivo Y58 5G ची किंमत कमी केली आहे. हे उपकरण कंपनीने या वर्षी जून महिन्यात लाँच केले होते. दरम्यान, आता फोनच्या किमतीत 1,000 रुपयांची कपात झाली आहे.

Also Read: OnePlus 13 Launch: अनेक AI फीचर्ससह फोन लवकरच भारतात होणार लाँच, Amazon वर सूचिबद्ध

Vivo Y58 5G ची नवी किंमत

Vivo चा Vivo Y58 5G फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत लाँचच्या 19,499 रुपये होती. वर सांगितल्याप्रमाणे, अलीकडेच या फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली. कपातीनंतर या फोनची किंमत 18,499 रुपये इतकी झाली. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, काही बँक कार्डच्या मदतीने फोनवर 1,000 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक मिळू शकतो. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y58 5G कंपनीच्या साइटवर आणि Amazon वर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Vivo Y58 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y58 5G फोनमध्ये वापरकर्त्यांना मोठा 6.72 इंच लांबीचा FHD + HD LCD डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसमध्ये 8GB RAM + 128 GB अंतर्गत स्टोरेज आणि 8GB विस्तारित रॅमसाठी समर्थन आहे. फोनमध्ये पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP64 रेटिंग देखील मिळेल.

Vivo Y58 5G price drop in India check new price specs

याव्यतिरिक्त, Vivo Y58 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राइमरी आणि 2MP सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6000mAh आकाराची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी जलद चार्जिंगसाठी 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येते. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी फोनला IP64 रेटिंग दिली गेली आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

]]>
OnePlus 13 Launch: अनेक AI फीचर्ससह फोन लवकरच भारतात होणार लाँच, Amazon वर सूचिबद्ध  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-oneplus-13-listed-on-amazon-check-here-all-details.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/upcoming-oneplus-13-listed-on-amazon-check-here-all-details.html Thu, 05 Dec 2024 11:51:00 +0530

प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus ने OnePlus 13 या फोन अलीकडेच जागतिक बाजारात लाँच केला आहे. दरम्यान, या फोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून टेक विश्वात सुरु आहे. या फोनबद्दल अनेक लीक्स आणि अहवाल सोशल मीडियावर दररोज येत असतात. मात्र, आता हा स्मार्टफोन कंपनीने प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon India वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. मात्र, लॉन्चची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. चला तर मग जाणून घेऊयात Amazon लिस्टिंगद्वारे OnePlus 13 चे पुढे आलेले तपशील-

Also Read: अखेर पॉवरफुल आणि बहुप्रतिक्षीत गेमिंग फोन iQOO 13 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 13 Amazon लिस्टिंग

oneplus 13

वर सांगितल्याप्रमाणे, आगामी OnePlus 13 फोन Amazon वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. यावरूनच लक्षात येते की, लवकरच हा फोन भारतीय बाजरात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी 2025 च्या सुरुवातीला भारतात दाखल होईल, असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, लीकनुसार या फोनची किंमत या स्मार्टफोनची किंमत 64,999 रुपयांपासून सुरू होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. हा फोन ब्लॅक, ब्लु आणि व्हाईट कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

OnePlus 13 चे अपेक्षित तपशील

Amazon लिस्टिंगदद्वारे OnePlus 13 फोनबद्दल अनेक तपशील पुढे आले आहेत. OnePlus 13 मध्ये 6.82-इंच लांबीचा 2K LTPO डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी क्रिस्टल शील्ड सुपर सिरॅमिक ग्लास देखील बसवण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या OnePlus मोबाईल फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिप मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Qualcomm चा अलीकडेच लाँच झालेला प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, या हँडसेटमध्ये AI फीचर्स, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

oneplus 13 (Image Source: oneplus.com)

स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झालया, या फोनमध्ये 24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. हा मोबाइल फोन Android 15 आधारित ColorOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 100w फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये 5G, 4G VoLTE, WiFi, Bluetooth, GLONASS, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट इ. मिळतील. मात्र, या फोनचे योग्य तपशील आणि किंमत फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

]]>
साला झुकेगा नही! Pushpa 2 ची प्री-बुकिंग तोडतेय सर्व रेकॉर्डस्, ‘अशा’प्रकारे तुम्हीही ऑनलाईन बुक करा तिकीटा  https://www.digit.in/mr/news/entertainment/pushpa-2-online-tickets-booking-easy-way-to-book-tickets-check-here-all-platforms-and-other-details.html https://www.digit.in/mr/news/entertainment/pushpa-2-online-tickets-booking-easy-way-to-book-tickets-check-here-all-platforms-and-other-details.html Thu, 05 Dec 2024 10:00:00 +0530

पुष्पा: द राइजच्या जबरदस्त यशानंतर 'Pushpa 2: द रुल' हा बहुप्रतिक्षित सिक्वेल अखेर आज 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आपणा सर्वांना माहितीच हे की, साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या चित्रपटाची आगाऊ बुकिंग म्हणजेच प्री-बुकिंग 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली. तसेच, चित्रपटाची प्री-बुकिंग सर्व रेकॉर्डस् तोडत आहे.

पुष्पा 2 तेलगू, कन्नड, बंगाली, तमिळ, हिंदी आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये रिलीज होईल, ज्यामुळे ते संपूर्ण भारतीय प्रेक्षकांसाठी प्रवेशयोग्य असेल. जर तुम्ही देखील ही ॲक्शन फिल्म पाहण्यास उत्सुक असाल, तर तुमच्या शहरातील पुष्पा 2 ची स्वस्त तिकिटे तुम्ही सहजपणे मिळवू शकता.

Also Read: PAN 2.0: नव्या पॅन कार्डसाठी ‘अशा’प्रकारे ऑनलाईन अप्लाय करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया

पुष्पा 2 च्या तिकिटांसाठी लोकप्रिय निवड: BookMyShow

प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म BookMyShow हे भारतातील चित्रपटाचे तिकिटे बुक करण्यासाठी सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. नव्या पुष्पा 2 चित्रपटाची तुमची तिकिटे सुरक्षित करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅटफॉर्म मेट्रो शहरे आणि टियर 2 शहरांसह अनेक शहरांची पूर्तता करतो, ज्यामुळे ते मोठ्या प्रेक्षकांसाठी प्रवेशयोग्य बनते.

Pushpa 2 the rule makers change theatrical release date check new date
  • तुमची तिकिटे बुक करण्यासाठी, फक्त वेबसाइटला भेट द्या किंवा तुमच्या फोनवर BookMyShow ॲप डाउनलोड करा.
  • एकदा तुम्ही प्लॅटफॉर्मवर आल्यावर 'Pushpa 2: द रुल' असे शोधा आणि तुमचा पसंतीचा शोटाइम आणि पाहण्याचा पर्याय निवडा.
  • BookMyShow 2D, 3D, IMAX 2D, 4DX आणि IMAX 3D सह एकाधिक फॉरमॅट ऑफर करते, जेणेकरून तुम्ही तुमचा आवडता एक्सपेरियन्स निवडू शकता.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 1.6 दशलक्ष वापरकर्ते चित्रपट पाहण्यात उत्सुक आहेत, त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे, असे BookMyShow ने उघड केले आहे. म्हणजेच तुम्ही जितक्या लवकर तिकिटे बुक कराल, त्यानुसार तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार शोटाइम आणि तुम्हाला हवी ती जागा मिळू शकते.

PayTM

PayTM देखील पुष्पा 2 साठी तिकीट बुक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही PayTM च्या ॲप किंवा वेबसाइटवर चित्रपट शोधू शकता, शोटाइम निवडू शकता आणि विविध व्ह्यूइंग फॉरमॅट देखील निवडू शकता.

PVR

चित्रपटाच्या तिकीट बुकिंगसाठी PVR हा आणखी एक उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्ही एकतर PVR वेबसाइटला भेट द्या किंवा PVR ॲप डाउनलोड करू शकता. इतर प्लॅटफॉर्म प्रमाणेच, PVR 2D आणि 3D स्क्रीनिंगसह विविध शोटाइम्स आणि व्ह्यूइंग फॉरमॅट ऑफर करतो. PVR बऱ्याचदा मॉर्निंग शो प्रदान करते, जे लवकर उठणाऱ्यांसाठी किंवा चित्रपट रिलीज होताच पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या चाहत्यांसाठी योग्य आहे. काही शहरांमध्ये, पहिली स्क्रीनिंग अगदी सकाळी 6 वाजता सुरु होते.

]]>
Best Smartphones Under 50000: उत्तम फोटोग्राफीसाठी जबरदस्त कॅमेरासह येणारे स्मार्टफोन्स, DSLR सुद्धा पडेल मागे  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-camera-smartphones-under-rs-50000-check-list.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/best-camera-smartphones-under-rs-50000-check-list.html Thu, 05 Dec 2024 06:00:00 +0530

Best Smartphones Under 50000: आजकाल अनेक स्मार्टफोन्स कंपन्या आपल्या फोनमध्ये उत्तम कॅमेरा देतात, ज्यांसमोर व्यावसायिक कॅमेरे सुद्धा फिके पडतात. जर तुमचे बजेट भारी आहे आणि तुम्ही चांगला टेलीफोटो कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 50,000 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या स्मटफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये उत्तम टेलीफोटो कॅमेरे आहेत. या स्मार्टफोन्सने तुम्ही अगदी दुरून देखील क्लियर आणि शार्प फोटोज काढण्यास सक्षम असाल. पहा यादी-

Also Read: भारीच की! Lava Blaze Curve 5G वर मिळतोय 5,000 रुपयांपर्यंत Discount, जाणून घ्या ऑफर्स

Vivo V40 Pro

vivo V40 5G Series smartphones

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo V40 Pro च्या बेस व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होते. Vivo V40 Pro फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे, जी Schott Xensation Alpha प्रोटेक्शनसह संरक्षित आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Dimensity 9200+ चिपसेट आहे. 80W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,500mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे. फोनच्या मागील बाजूस एक मोठा कॅमेरा बेट आहे ज्यामध्ये Zeiss-ट्यून केलेला 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलिफोटो लेन्स आहे. तसेच, तुम्हाला एक 50MP सेल्फी शूटर देखील मिळेल.

Realme GT 6

Realme-GT6-Top-5-features
Realme-GT6-

आगामी Realme GT 6 स्मार्टफोन 40,999 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6.78-इंच लांबीची 120Hz AMOLED स्क्रीन उपलब्ध आहे. प्रोटेक्शनसाठी या डिस्प्लेवर गोरिला ग्लास व्हिक्टस 2 मिळणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8s Gen 3 चिपसेटद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलिफोटो लेन्स आहे. तर, यात अल्ट्रावाइड कॅमेरा 8MP सेन्सरसह समर्थित आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5500mAh बॅटरीसह येतो, जी 120W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy S23

Samsung Galaxy S23 फोन सध्या Amazon वर 49,997 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या कॉम्पॅक्ट फोनमध्ये 6.1-इंच लांबीची 120Hz AMOLED स्क्रीन आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येतो. फोटोग्राफीसाठी, यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूम असलेली 10MP टेलिफोटो लेन्स आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 3,900mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे, जो 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला समर्थन देते.

]]>
Instagram वर कोण ठेवतंय तुमच्यावर गुपचूप नजर? ‘या’ सोप्या पण महत्त्वाच्या ट्रिकद्वारे कळेल सर्व काही https://www.digit.in/mr/news/apps/who-is-secretly-watching-you-on-instagram-this-easy-trick-will-tell-you-everything.html https://www.digit.in/mr/news/apps/who-is-secretly-watching-you-on-instagram-this-easy-trick-will-tell-you-everything.html Wed, 04 Dec 2024 16:57:00 +0530

आपणा सर्वांना माहितीच आहे की, Instagram हे एक लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्याबरोबरच, रील्स आणि अनेक प्रकारच्या कंटेंट क्रिएशनसाठी आजच्या काळात इंस्टाग्रामची क्रेझ खूप वाढली आहे. सध्या बरेच लोक त्यांचे नवीनतम फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी Instagram ॲप वापरतात. दरम्यान, असे काही लोक आहेत जे फक्त इतर वापरकर्त्यांना स्टॉक करण्यासाठी Instagram वापरतात. स्टॉकर्स इन्स्टावर तुम्हाला फॉलो करत नाहीत, तर शांतपणे तुमच्या प्रोफाइल पाहत असतात.

Instagram
Instagram

Instagram वर तुमच्या कोण कोण नजर ठेवताय हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? जर होय, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर नजर ठेवणाऱ्या लोकांची यादी कुठे मिळेल, ते सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा अवलंब करण्याची गरज नाही. अशा लोकांची यादी तुम्ही इंस्टाग्राम ॲपमध्येच एका ट्रिकसह पाहू शकता.

Also Read: भारीच की! Lava Blaze Curve 5G वर मिळतोय 5,000 रुपयांपर्यंत Discount, जाणून घ्या ऑफर्स

Instagram वर कोण ठेवतंय तुमच्यावर नजर? जाणून घ्या पुढीलप्रमाणे:

  • Instagram वर तुमचा पाठलाग कोण करत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्मार्टफोनवर इन्स्टाग्राम ॲप ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. आता वरच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन ओळींच्या आयकॉनवर क्लिक करा.
  • यानंतर, खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Blocked चा पर्याय दिसेल. ब्लॉक केलेल्या पर्यायामध्ये तुम्ही ब्लॉक केलेली सर्व अकाउंट्स दिसतील.
insta new features
  • याच विभागात तुम्हाला तुमच्या स्टॉकर्सची यादी देखील पाहता येईल. यासाठी तुम्हाला ब्लॉक लिस्टमध्ये खाली स्क्रोल करावे लागेल.
  • शेवटी तुम्हाला 'You May Want to Block' असा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर जाताच तुमच्यासमोर एक नवीन यादी ओपन होईल.
  • . या यादीमध्ये तुम्हाला इन्स्टाग्रामवर तुमच्यावर गुपचूप नजर ठेवणारे सर्व अकाउंट्स दिसतील.
]]>
भारीच की! Lava Blaze Curve 5G वर मिळतोय 5,000 रुपयांपर्यंत Discount, जाणून घ्या ऑफर्स  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-lava-blaze-curve-5g-with-discount-from-amazon-check-offers.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/buy-lava-blaze-curve-5g-with-discount-from-amazon-check-offers.html Wed, 04 Dec 2024 15:35:00 +0530

देशी स्मार्टफोन निर्माता Lava ने या वर्षी मार्चमध्ये आपला Lava Blaze Curve 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन लाँच होताच भारतीय वापरकर्त्यांनी या फोनला खूप चांगले रेटिंग दिले आहे. दरम्यान, कंपनी या फोनवर आता 3,500 रुपयांची सूट देत आहे. तसेच, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, EMI इ. अनेक ऑफर्स मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Lava Blaze Curve 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Motorola चा नवा स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत असेल 10 ते 15,000 रुपयांअंतर्गत

Lava Blaze Curve 5G Specification

Lava Blaze Curve 5G ची किंमत आणि ऑफर्स

Lava Blaze Curve 5G बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची लाँच प्राईस 17,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची लाँच प्राईस 18,999 रुपये इतकी आहे. मात्र, सध्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यांनतर फोनची किंमत अनुक्रमे 14,499 रुपये आणि 15,499 रुपये इतकी झाली आहे.

यावरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला डिव्हाइसवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. हे EMI आणि सामान्य व्यवहारांवर उपलब्ध असेल. तसेच, एक्सचेंज ऑफरअंतर्गत 13,950 रुपयांपर्यंत सूट मिळवता येईल. या ऑफर्ससह नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने Lava Blaze Curve 5G 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर देखील खरेदी केला जाऊ शकतो. अधिक महिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Lava Blaze Curve 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Blaze Curve 5G Specification

Lava Blaze Curve 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED 3D कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, मागील पॅनलमध्ये EIS आणि 20X ऑप्टिकल झूम, 8MP वाइड-एंगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा लेन्ससह 64MP प्रायमरी कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,000mAh बॅटरी आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, चांगल्या ऑडिओसाठी डॉल्बी ॲटमॉस स्पीकर इ. आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

]]>
Motorola चा नवा स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत असेल 10 ते 15,000 रुपयांअंतर्गत  https://www.digit.in/mr/news/mobile-phones/motorola-new-moto-g35-india-launch-date-confirm-check-expected-price-and-details.html https://www.digit.in/mr/news/mobile-phones/motorola-new-moto-g35-india-launch-date-confirm-check-expected-price-and-details.html Wed, 04 Dec 2024 12:23:00 +0530

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने आपल्या आगामी स्मार्टफोन Moto G35 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, कंपनीने आगामी फोनची भारतीय लाँच डेट देखील जाहीर केली. आम्ही तुम्हाला सांगतो की, अवघ्या पुढील आठवड्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून होईल. जाणून घेऊयात Moto G35 5G चे भारतीय लॉन्चिंग तपशील-

Also Read: लेटेस्ट iQOO 13 लाँच होताच iQOO 12 5G वर मिळतोय प्रचंड Discount, भारी ऑफर्ससह उपलब्ध

Moto G35 5G भारतीय लाँच डेट

Motorola चा आगामी स्मार्टफोन Moto G35 5G फोन येत्या 10 डिसेंबर 2024 रोजी लाँच होणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनची विक्री इ-कॉमर्स साईट Flipkart वरून सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या हँडसेटला वेगन लेदर डिझाइन देण्यात आले आहे. हा फोन Xiaomi, Realme आणि Oppo सारख्या कंपन्यांच्या मध्यम श्रेणीच्या फोन्सना जोरदार स्पर्धा देईल. ते ग्रीन, रेट आणि ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध असेल. लीकवर विश्वास ठेवला तर, या हँडसेटची किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान निश्चित केली जाऊ शकते.

Moto G35 5G चे अपेक्षित तपशील

Flipkart लिस्टिंगमध्ये Moto G35 चे काही फीचर्स उघड झाले आहेत. या फोन 6.7-इंच लांबीचा FHD Plus डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आणि टच सॅम्पलिंग दर 240Hz आहे. प्रोटेक्शनसाठी त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 बसवण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात व्हिजन बूस्टर आणि नाईट व्हिजन मोड देखील आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये UNISOC T760 चिप देण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 4GB रॅम, व्हर्च्युअल रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे.

Upcoming motorola Moto G35 5G in India

याव्यतिरिक्त, उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी या आगामी मोबाईल फोनमध्ये 50MP प्राथमिक आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. याद्वारे 4K व्हिडीओही रेकॉर्ड करता येणार आहे. आकर्षक सेल्फीसाठी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. तसेच, यात डॉल्बी ATMOS सह ड्युअल स्पीकर तसेच Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स देण्यात आले आहेत.

]]>
PAN 2.0: नव्या पॅन कार्डसाठी ‘अशा’प्रकारे ऑनलाईन अप्लाय करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया https://www.digit.in/mr/news/general/how-to-apply-for-pan-2-0-online-check-step-by-step-easy-process.html https://www.digit.in/mr/news/general/how-to-apply-for-pan-2-0-online-check-step-by-step-easy-process.html Wed, 04 Dec 2024 11:28:00 +0530

PAN 2.0: परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच PAN अलॉट आणि अपडेट प्रक्रिया सुधारण्यासाठी आयकर विभागाने PAN 2.0 सादर केला आहे. QR कोड असलेले ई-पॅन कार्ड अर्जामध्ये नोंदणीकृत ईमेल आयडीवर विनामूल्य पाठवले जाईल, असते सांगण्यात आले आहे. मात्र, लक्षात घ्या की, करदात्यांना फिजिकल पॅन कार्डसाठी काही शुल्क भरावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे विद्यमान पॅन कार्ड QR कोड नसतानाही वैध असतील.

दरम्यान, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला पॅन 2.0 बद्दल माहिती देणार आहोत. होय, पॅन कार्डच्या डिजिटल ऍप्लिकेशनपासून ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत.

Also Read: How to: आता Instagram वर देखील पाठवता येईल Live लोकेशन, जाणून घ्या अगदी सोपी प्रक्रिया

PAN 2.0 साठी अर्ज कोण करू शकतो?

तुम्ही सध्या पॅनकार्ड धारक असल्यास, तुम्ही नवीन पॅन कार्ड मिळविण्यासाठी सहज पात्र आहात. जर तुम्ही नवे अर्जदार आहात, तर तुम्हाला पॅन कार्ड असण्याचे मूलभूत पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे. त्याबरोबरच, वैध ओळख आणि पत्ता पुरावा आवश्यक आहे. पॅन 2.0 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

PAN 2.0 साठी अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी युनिफाइड पोर्टलवर जा.
  • आता तुमचे नाव, जन्मतारीख आणि संपर्क माहिती यासारखे आवश्यक तपशील भरा.
  • खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती सबमिट करा:
  1. Aadhaar कार्ड, Voter ID, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
  2. ऍड्रेस प्रूफ: युटिलिटी बिल, रेंट ऍग्रिमेंट्स किंवा बँक स्टेटमेंट.
  3. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पासपोर्ट.
  • तुम्ही प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि पोर्टलद्वारे सुरक्षितपणे अर्ज सबमिट करा.

दुसरी पद्धत: पॅन 2.0 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा:

सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पॅन NSDL किंवा UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड (UTIITSL) द्वारे जारी केला गेला आहे का? हे तपासावे लागेल. ही माहिती तुमच्या पॅन कार्डच्या मागील बाजूला मिळेल.

NSDL द्वारे ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा:

  • सर्वप्रथम NSDL e-PAN पोर्टलवर जा.
  • येथे तुम्हाला तुमचा पॅन, आधार आणि जन्मतारीख टाकावी लागेल. त्यानंतर OTP कसा मिळवायचा ते निवडा.
  • पुढे जाण्यासाठी 10 मिनिटांच्या आत OTP एंटर करा. पॅन जारी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत तीन पर्यंत विनंत्या मोफत आहेत. त्यानंतरच्या विनंत्यांची किंमत जीएसटीसह 8.26 रुपये आहे.
  • पेमेंट केल्यानंतर, ई-पॅन 30 मिनिटांच्या आत तुमच्या नोंदणीकृत आयडीवर Email केला जाईल.
PAN 2.0 - PAN Card Update

UTIITSL द्वारे ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा:

  • सर्वप्रथम तुम्हाला UTIITSL ई-पॅन पोर्टल https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard वर जावे लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा पॅन, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • जर कोणताही ईमेल नोंदणीकृत नसेल तर प्रकल्प अधिकृतपणे लाँच झाल्यानंतर, तुम्हाला ते पॅन 2.0 अंतर्गत अपडेट करावे लागेल.
  • गेल्या 30 दिवसांत जारी केलेल्या ई-पॅनसाठी मोफत. यानंतर विनंती खर्च रु. 8.26 आहे.
  • यानंतर, तुमचा ई-पॅन नोंदणीकृत Email ID वर PDF स्वरूपात येईल.
]]>